• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

विजया इतकाच सामाजिक सलोखा महत्वाचा..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 24, 2024
in ताज्या बातम्या
0

बीड लोकसभेप्रमाणे निकाल लागण्याची कोणतीही भीती मला वाटत ,मी निश्चित विजय होईल पण माझ्या विजयापेक्षा मला गावागावात शांतता आणि सलोखा निर्माण करायचा आहे असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे,आपण जवळपस 70 ते 72 गावांमध्ये चर्चा केली असून लोकसभेला ज्या पद्धतीचं वातावरण होतं, तसं कुठेही दिसलं नाही, हे मी खात्रीने सांगतो. मला मत द्यावं की नाही, हा लोकशाहीत जनतेचा अधिकार आहे. पण महाराष्ट्रातील प्रत्येक गावात जो सामाजिक सलोखा मागच्या काळात बिघडलाय. ज्या लहान मुलाला वाचता येत नाही, तो जातीवर भांडतोय. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारं नाही. निवडणुका येतील-जातील, जय-पराजय होईल, कुठला पक्ष सत्तेत यायचा तो येईल, पण सामाजिक सलोखा निर्माण झाला पाहिजे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी बिघडलेला सामाजिक सलोखा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी गावातील लोकांना एकत्र बसलं पाहिजे, कोणाला मतं द्यायचं हे ठरवायचं, त्यातूनच सामाजिक सलोखा पूर्ववत होईल, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले. परळी माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे.लोकसभा निवडणुकीत परळीतील जनतेने 75 हजारांचं मताधिक्य दिलं. या प्रेमातून आम्ही उतराई होऊ शकत नाही. त्यांचे प्रश्न सोडवणे हाच या प्रेमातून उतराई होण्याचा मार्ग आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

प्रत्येकाला आपल्या जीवनातील प्रारब्ध भोगावा लागतो. तो का येतो, त्याची कारणं काय असतात, हे महत्त्वाचं नसतं. पण प्रारब्ध हा देवाला चुकला नाही तर आपल्याला चुकू शकत नाही. पण ज्यावेळेस जनमानसाची भावना कुठेतरी आम्ही एकत्र यावं, ती भावना नियती ऐकते. मग नियती कशातरी पद्धतीने आम्हाला राजकीयदृष्ट्या एकत्र आणले. आमच्या मनात होते ते नियतीने घडवून आणले.

धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला. बीडच्या परळी तहसील कार्यालयामध्ये भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे यांनी विधानसभेकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पाच लाडक्या बहिणी त्यांच्या सोबत उपस्थित होत्या.

Previous Post

प्रवेश झाला की ए बी फॉर्म,रमेश आडसकर निश्चित…

Next Post

क्षीरसागर की मेटे ; बीडला उमेदवारी कोणाला?

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
क्षीरसागर की मेटे ; बीडला उमेदवारी कोणाला?

क्षीरसागर की मेटे ; बीडला उमेदवारी कोणाला?

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.