

( प्रमोद कुलकर्णी )-शरीराने अपंग असेल तर फारसं काही अडत नाही पण मेंदूचे अपंगत्व, विकार असेल तर सर्वच आडतं. मेंदूचा व्यायाम, त्याला उल्हासित, ताजेतवाने ठेवण्यासाठी आनंदी मन असणे गरजेचे असते, धार्मिक पूजा विधी, एकत्र साजरे केले जाणारे उत्सव, कुटुंबातील मंगल कार्य याचे यथाशक्तीने भव्य नियोजन हे मेंदू अधिक कार्यरत, तल्लक, ऊर्जावान होण्यासाठी आणि सकारात्मक जीवन मार्गावर कार्यरत राहण्यासाठी महत्त्वाचे ठरत असतात, असा मौलिक सल्ला मेंदूच्या आजारापासून दूर राहण्यासाठीचा आहे.

आपल्या प्रत्येकाच्या घरी एखादे मंगलकार्य, पूजा विधि अथवा धर्मपरंपर्यातील सणवार उत्सव साजरे करण्याचे प्रसंग आपल्या मेंदूची क्षमता विकसित करण्यासाठी अत्यंत मोलाचे कार्य करतात. घरात मंगलकार्य आहे, हा संस्कार सोहळा म्हणजे कर्मकांड किंवा परंपरेतील अनिवार्य विधी नसून त्याचे पूर्व आणि पूर्ण नियोजन करण्यासाठी आपल्या सकारात्मक ऊर्जा निर्मितीचे केंद्र असलेल्या मेंदू चे काम सुरू होत असते, यानिमित्ताने स्नेहीजन ,मित्र, सर्व कुटुंब ,नातेवाईक, परिचयातील सर्वांची आठवण करून त्यांची नोंद घेत यादी तयार करणे म्हणजे स्नेहभाव मनात उत्पन्न होण्याची प्रक्रिया मेंदूला उल्हासित करीत असते.


आग्रहपूर्वक निमंत्रण सर्वांना देणे हा भाग म्हणजे प्रत्येकाच्या सुखदुःखाची चौकशी, नोंद घेत अस्थेवाईकपणे स्नेहमिलनाची आस उत्पन्न करणारा एक संस्कार मेंदूवर कोरला जात असतो.
आपल्या घरी मोठ्या संख्येने आप्तेष्ट, स्नेही जन ,लहानथोर, महिलापुरुष हे सर्व या मंगल प्रसंगासाठी उपस्थिती देणार आहेत, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी, सन्मान, पाहुणचारासाठीच्या योजनेत सर्व कुटुंब कार्यरत होत असते, म्हणजेच सर्व कुटुंबाच्या मेंदू बुद्धीला वाव, चालना देत अधिक आनंदी, उत्साही मंगल प्रसंग साजरा करण्यासाठी नियोजन होत असते. हा देखील मेंदू बलवान होण्यासाठीचा संस्कार असतो.
पूर्व आणि पूर्ण नियोजनासाठी सर्वंकष चर्चा-विचार विनिमय होते, लग्न ,कार्य, धार्मिक विधी कोणत्याही अशा मंगल प्रसंगात कर्त्या मंडळींना झोप, तहान- भूक याची फारशी परवा राहत नाही तो केवळ यशस्वीतेसाठी, प्रेमभाव देवाण-घेवाण यात रममान झालेला असतो ,याचा अर्थ मेंदू त्यावेळी त्याची पूर्ण शक्ती विकसित करत परमोच्च सक्षम झालेला असतो.
कोणतेही कार्य ,सण, उत्सव, मंगल प्रसंग संपन्न झाल्यानंतर जो समाधानाचा भाव सर्वांच्या मनात ,चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत असतो ,ती पावती पुढील जीवनासाठी सकारात्मक ऊर्जा देऊन जाणारी असते. कोणत्याही मंगल प्रसंग साजरे करण्यासाठी मनुष्य आपली सर्व शक्ती एकवटून तो अधिक आनंदी, मंगलमय होण्यासाठी आपल्या बुद्धीने ,कौशल्याने मनोभावे समर्पण देत असतो, यातूनच “मेंटली फिटनेस” जीवन जगण्याची सकारात्मक ऊर्जा मिळत असते, जी अत्यंत मोलाची ठरते, असे अत्यंत मौलिक, वैज्ञानिक सांगड घालत आपल्या धर्म परंपरेतील सणवार, उत्सव ,मंगलकार्या संबंधीचे विचार मेंदू विकार तज्ञ डॉ.पिंगळकर यांनी स्पष्ट करत ,या उलट मेंदूचा आजार होतो म्हणजे, अमंगल प्रसंगातून, संकट ,दुःखाच्या भावनेमुळे मेंदू विकार निर्माण होतात. कुटुंबातील सदस्य मृत्यू पावल्याने मन दुखी होते त्यावेळी पोटभर जेवण केलेले असले तरी मन उदास असल्याने मेंदू बुद्धी काम करणे बंद करत असते, नैराश्यातून मेंदू विकार निर्माण होतात. तहान लागली तरी उठून पाणी प्यावे असे देखील वाटत नाही. मनात वाईट विचार, भीती घाबरवणारी विचारांची गर्दी होते ,संकटाची चाहूल, त्या मार्गाचा विचार मेंदू बुद्धीला आजारी पाडण्यास कारणीभूत ठरतात, त्यामुळे आपल्या संस्कृतीत एकत्र येऊन सण, उत्सव, महोत्सव मंगल प्रसंगाची आखणी आणि त्याची अनिवार्यता धर्मशास्त्रांनी सांगितली आहे असाही अर्थ घेणं महत्त्वाचं आहे,त्याकडे कर्मकांड, रूढी परंपरा , चुकीचा अर्थ न घेता “मेंटली फिटनेस “जीवन जगण्यासाठी सकारात्मक ऊर्जा देणारा मेंदूवरील महत्त्वपूर्ण औषधोपचार असेही मानलेच पाहिजे.बुद्धिमत्तेने मेंदूवर उपचार करत…
“विश्व” भाव ,”विशाल” भावना ठेवून ,
“विश्वास” कमवणारे डॉ पिंगळकर.
Because every life matters, प्रत्येक जीवन मौल्यवान आहे हेच ब्रीद घेऊन व्यापकता आणि सर्वसमावेशकता हा “विश्व” भाव जपणारे प्रभावी आणि उदारता अशी “विशाल” भावना जपणारे डॉ पिंगळकर.
“मेंदू”, शरीरातील मुख्य नियंत्रण करणारा माणसाचा अवयव ,जो भावना, बुद्धी, स्मरणशक्ती, हालचाल या सर्वांचे नियंत्रण करतो. संपूर्ण शरीरात रक्तपुरवठा ,ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करणारे “हार्ट” आणि श्वासोच्छ्वाससाठीअसणारे “फुफ्फुसे” हे तिन्ही अत्यंत महत्त्वाचे असतात.
मेंदू हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव मानला जातो, त्यामुळे यावरील उपाय आणि याचे तज्ञ डॉक्टर देखील तेवढेच महत्त्वाचे ठरतात. डोक्यातला मेंदू काम करत नाही तेव्हा सर्व शरीराचे काम बंद होते .डोक्यावर परिणाम कशामुळे होतो ? तर जे शरीरासाठी काळजी घेण्याचे विषय तेच मेंदूसाठी पण असतात त्यासोबतच ताण -तणाव हेही एक कारण ठरते. सतत मन प्रसन्न ठेवणे हा एक महत्त्वाचा उपाय त्यावरचा असतो. उपचार ,शस्त्रक्रिया यासोबत समुपदेशन हा एक महत्त्वाचा उपचार तज्ञ डॉक्टरांमार्फत केला जातो. डॉक्टर आणि पेशंट हे नाते जेवढे समजूतदारपणाचे असते, तेवढा औषधोपचार अधिक गतीने लागू पडतो. फॅमिली डॉक्टर किंवा माझे डॉक्टर हा भाव पेशंटच्या मनात असायला हवा ,मला माझ्या वेदनेपासून, आजारापासून ते नक्की बरी करतील हा विश्वास डॉक्टरांवर असेल तर तेवढ्याच गतीने लवकर बरा होतो. हॉस्पिटल ,वैद्यकीय सेवा, डॉक्टर यांच्या बद्दलचा विश्वास ढळतो आहे, याची कारणमीमांसा हा एक मोठा आणि वेगळा विषय आहे, याला अपवाद नव्हे तर प्रत्येक डॉक्टरांची भावना एक सारखीच असते की, माझ्याकडे आलेला पेशंट लवकर तंदुरुस्त झाला पाहिजे. त्यासाठी योग्य वेळेत निदान आणि औषधोपचार, समुपदेशन होत असते. विश्वास ठेवणं ,वेळ देणं, संयम राखणं याची तयारी पेशंट आणि नातेवाईकात कमी झाल्याचे डॉक्टर आणि आरोग्य सेवेकडे पाहण्याची दृष्टीही बदलते आहे.
बीडमधील पाच वर्षां पैकी स्वतंत्रपणे तीन वर्षांपूर्वी सुरू केलेले “विश्व न्यूरो स्पाईन सर्जिकल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल” आणि येथील मुख्य तज्ञ “डॉक्टर विशाल पिंगळकर” यांनी मोठा विश्वास कमवला आहे, हीच माझी मोलाची ठेव आहे हा डॉक्टरांचा स्वभाव आहे. पेशंट आणि सोबतचे नातेवाईक बोलतात तीच माऊथ पब्लिसिटी हीच विश्वासाची पावती आहे.
डोक्याचे, मणक्याचे अपघात ,अर्धांगवायू ,ब्रेन स्टोक, डोकेदुखी ,अर्धी डोके दुखणे, मणक्यात गॅप, झटके येणे, अशा नाजूक आजारावरील उपचारासाठी बीड मध्ये तज्ञ डॉक्टर उपलब्ध असणे हेच खूप मोलाचे आणि महत्त्वाचे आहे.
डॉ .विशाल पिंगळकर, एका सामान्य कुटुंबातून आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने उच्च वैद्यकीय शिक्षण घेऊन बीड परिसर क्षेत्रात आरोग्य सेवेत उपलब्ध झालेले आहेत .
मला जे ज्ञान प्राप्त आहे त्याचा पूर्ण उपयोग करून उत्कृष्ट सेवा देण्याचे काम हीच माझी सेवा आणि साधना आहे असे मानणारे डॉक्टर पिंगळकर आहेत.त्यांचा अनुभव घेऊन तणावमुक्त, सुदृढ आणि आनंदी झालेले पेशंट आणि त्यांचे नातेवाईक सांगतात, त्यात बीड येथील मायक्रोबायोलॉजी डॉक्टरेट असलेले एक प्राध्यापक ,वडिलांच्या उपचारासाठी विश्व हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा पेशंट, नातेवाईक आणि डॉक्टर यांचे नाते कसे असावे? ट्रीटमेंटची पारदर्शकता ,गरज आणि पूर्ण प्रयत्न होत असल्याने विश्व हॉस्पिटल आणि पिंगळकर डॉक्टर वरील विश्वास त्यांच्या भावनेतून आणि चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून येत होता,असे बुद्धिमत्तेने मेंदूवर उपचार करणारे तज्ञ डॉक्टर पिंगळकर बीड करांना भेटले हेच भाग्याचे आहे.
————————–
“चि. विहान ” डॉ विशाल पिंगळकर यांचे
चिरंजीव , डॉ.अविनाश देशपांडे यांचे नातू यांचा उपनयन संस्कार सोहळा ,आज ६ मे रोजी माऊली लॉन्स येथे, सकाळी ११ :३१ वा.संपन्न होत आहे.
“विहान’ म्हणजेच नई सुरुवात, fresh start या अर्थाप्रमाणे विज्ञान आणि अध्यात्माची सांगड संस्काराने फुलवत आयुष्याची पुढची वाटचाल यशस्वी होण्यासाठीच्या या सोहळ्याच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा…..
———–
प्रमोद कुलकर्णी, (९४०३९०४६५१)
————————

