• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

या वयात तरी खोटं बोलू नका;देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 30, 2024
in राजकारण, ऑनलाईन वृत्तसेवा
0

या वयात तरी खोटे बोलू नका म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचा खोटेपणा उघड केला आहे,ज्यांच्या काळात कधी गुजरात तर कधी कर्नाटक क्रमांक एकवर होते ते आज महाराष्ट्र एक क्रमांकावर असतांना अधिकच अस्वस्थ झालेत अशी सणसणीत चपराक देखील देवेंद्र फडणवीस यांनी एक्स वर दिली आहे.

“या वयात इतके खोटे बोलायचे नसते. काल जयराम रमेशजी आणि आज शरद पवारजी, ज्यांच्या काळात गुंतवणूक आणण्यात कधी गुजरात तर कधी कर्नाटक नंबर एकवर होते, ते आज महाराष्ट्र क्रमांक एकवर आल्यावर जरा अधिकच अस्वस्थ झालेत. तरी सुद्धा खोटा नरेटिव्ह सेट होण्यापूर्वी वास्तव महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगावे लागेल,” असं म्हणत फडणवीस यांनी टाटा एअरबस, फॉक्सकॉन या प्रकल्पाची उदाहरणं दिली आहेत.

“टाटा एअरबस, फॉक्सकॉन असो किंवा अन्य प्रकल्प सातत्याने खोटे बोलून मविआच्या नेत्यांनी दिशाभूल केली. सॅफ्रॅनच्या बाबतीत तर कहरच केला होता. कंपनीने २ मार्च २०२१ लाच हैदराबादेत त्यांच्या प्रकल्पाचे उदघाटन केले होते. पण, आमचे सरकार आल्यावर तोही प्रकल्प गुजरातला गेल्याची आरोळी उठवली गेली. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी या सर्वांबाबत मी स्वत: मंत्रालयात एक पत्रपरिषद घेतली होती. सर्व मुद्यांचे सविस्तर सादरीकरण केले होते. पण, पुन्हा पुन्हा खोटे बोलून तोच तो अजेंडा सांगितला जात आहे. स्वत:जवळ काही सांगण्यासारखे नसले तर खोट्याशिवाय कशाचाच सहारा नसतो, हेच सत्य आहे. असू द्या. एकीकडे ५२ टक्के परकीय गुंतवणूक राज्यात आणणारे सरकार आहे आणि दुसरीकडे गुजरातच्या ब्रँड अ‍ॅम्बॅसिडरच्या भूमिकेतील कर्तव्यशून्य महाविकास आघाडी. राज्यातील जनताच याचा निकाल २० नोव्हेंबरला लावेल,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Previous Post

नरकचतुर्दशी…….

Next Post

रसिक फाउंडेशन तर्फे पाडव्याच्या पहाटे सभासदांसाठी बहारदार मैफिल..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

रसिक फाउंडेशन तर्फे पाडव्याच्या पहाटे सभासदांसाठी बहारदार मैफिल..

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.