• Contact Us
  • Home
Wednesday, June 17, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

इच्छुकांनो उद्या या,गनिमीकावा करावा लागेल-जरांगे

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 23, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

मी मुलाखती घेणार नाही. जे इच्छुक आहेत ते प्रचंड आहेत. न्याय द्यायचा असेल तर एक द्यावा लागणार आहे, हे समाजाला माहित आहे.अनेक जण इच्छुक आहेत म्हणून मीच त्यांना इकडे बोलून घेत आहे,मात्र रात्रीपासून फोन सुरू झाले आहेत. पण माझं असं म्हणणं आहे सगळं एका टप्प्यात करू. राहिलेले जिल्हे एक-दोन दिवसात घ्यायचे होते. मात्र उद्याच सगळे या आशा शब्दात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी इच्छुकांना उद्या बोलावले आहे.

उद्या सकाळी 8 वाजल्यापासून आपण प्रक्रिया सुरू करू. रात्रीचे 12 वाजो की 4 वाजो सगळ्यांशी चर्चा करणार आहे. इच्छुकानी कार्यकर्त्यांना सोबत आणू नये असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.

कुणीही फॉर्म भरू नका. कारण बाकीचे लोक आपल्याला नाव ठेवतील. मी उद्या मतदारसंघ सांगणार नाही. आपण एक – एक उमेदवार तयार करत आहोत ज्या मतदारसंघात आपण लढवायचं ठरवलं आहे. त्याच मतदारसंघात लढवायचं बाकीच्यांनी फॉर्म काढून घ्यायचे. उद्या राहिलेले सगळे जिल्हे येऊन जा. दोन-चार गावाला सांगून ठेवले जेवणाची व्यवस्था करून ठेवा. पूर्ण तोडगा काढण्याचा उद्या प्रयत्न करणार आहे, असं जरांगे म्हणालेत.गनिमी कावा साधावा लागणार आहे.

आम्ही फक्त उद्या एक उमेदवार देण्याची प्रक्रिया पूर्ण करतोय. त्यांच्या पूर्ण याद्या कळाल्याशिवाय मतदारसंघ आणि उमेदवार सांगणार नाही. त्यांचे कोण आहेत ते आम्हाला आधी बघायचे आहे कारण त्यांनी आमच्यावर डाव टाकला होता. त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर डाव टाकावा लागणार आहे. त्यांचे उमेदवार कोण आहेत हे बघणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपला उमेदवार आणि मतदारसंघ आताच कळू द्यायचा नाही सावधगिरी गनिमी काव्याने डाव ठरवायचा आहे, असंही जरांगे म्हणालेत.

Previous Post

अजितदादांनी केली पहिली यादी जाहीर

Next Post

दिलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा ठराव म्हणून वंचितच्या मराठवाडा अध्यक्षांचा राजीनामा

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

दिलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा ठराव म्हणून वंचितच्या मराठवाडा अध्यक्षांचा राजीनामा

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी-देवेंद्र फडणवीस

June 2, 2026

विश्वकल्याणार्थ ९० दांपत्यांच्या ‘पंचकुंडीय भव्य विष्णूयाग’ संपन्न

June 2, 2026

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.