• Contact Us
  • Home
Wednesday, June 24, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

शिवसेनेच्या चिन्ह प्रकरण पुन्हा लांबणीवर…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 8, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा
0
शिवसेनेच्या चिन्ह प्रकरण पुन्हा लांबणीवर…

१२ नाेव्‍हेंबरपासून अंतिम सुनावणी

दिल्ली (प्रतिनिधी) केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्‍यबाण चिन्‍ह देण्‍याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्‍च न्‍यायालयात आव्‍हान दिले होते.या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी न्‍यायालयाने १२ नाेव्‍हेंबरपासून अंतिम सुनावणी हाेईल, असे न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्ज्वल भुयान आणि एनके सिंह यांच्‍या खंडपीठाने स्‍पष्‍ट केले.

न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्ज्वल भुयान आणि एनके सिंह यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ज्‍येष्‍ठ वकील कपिल सिब्‍बल यांनी ठाकरे गटाच्‍या वतीने युक्‍तीवाद केला. महाराष्‍ट्रामध्‍ये स्‍थानिक स्‍वराज संस्‍थाच्‍या निवडणुका जानेवारीमध्‍ये आहेत. कृपया लवकरात लवकर सुनावणी घ्‍या. कारण हा पक्ष नाव आणि चिन्‍हाचा प्रश्‍न आहे, अशी विनंती सिब्‍बल यांनी केली. यावर न्‍यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्‍पष्‍ट केले की, या प्रकरणी आम्‍ही १२ नोव्‍हेंबर २०२५ पासून अंतिम सुनावणी घेवू.

१२ नोव्‍हेंबरपासून सलग अंतिम सुनावणी …

आजच्‍या सुनावणीवेळी शिंदे गटाच्‍या वकिलांनी आम्‍हाला युक्‍तीवादासाठी तीन दिवस हवे आहेत, असे सांगितले तर कपिल सिब्‍बल यांनी मला फक्‍त ४५ मिनिटे युक्‍तीवादासाठी हवी आहेत, असे सांगितले. एकूणच पुढील तीन दिवस सलग सुनावणी घेण्‍यापेक्षा आता १२ नोव्‍हेंबरपासून सलग अंतिम सुनावणी घेण्‍यात येईल, असे न्‍यायालयाने म्‍हटल्‍याची माहिती वकील असीम सरोदे यांनी माध्‍यमांशी बोलताना दिली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्‍ये एकनाथ शिंदे यांच्‍या पक्षाला शिवसेना नाव आणि चिन्‍ह दिले होते. पक्ष नाव आणि चिन्‍ह यासाठी शिवसेनेच्‍या ठाकरे आणि शिंदे गटात गेली दोन वर्ष न्‍यायालयीन लढाई सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाने जुलै २०२५ मध्‍ये सर्वोच्‍च न्‍यायालयात पक्ष नाव आणि चिन्‍हा निर्णयासंदर्भात अंतरिम अर्ज केला होता. यामध्‍ये महाराष्‍ट्रात आगामी स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुकीत शिवसेना शिंदेगटाला पक्षाचे नाव शिवसेना आणि चिन्‍ह धनुष्‍यबाण चिन्‍ह गाेठविण्‍यात यावे, अशी मागणी केली होती. यावर ऑगस्‍ट महिन्‍यात सुनावणी होणार होती. मात्र ती लांबणीवर पडली. मात्र या प्रकरणाला आता सुमारे दोन वर्ष झाली आहेत. त्‍यामुळे आम्‍ही या प्रकरणाचा निकाल देऊ, असे मागील सुनावणीवेळी न्‍यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्‍पष्‍ट केले होते.

Previous Post

कही खुशी कही गम ;बीड न.प. प्रभाग आरक्षण जाहीर!

Next Post

उद्या राज्यपाल बागडे यांच्या उपस्थितीत शिवाजीराव पंडित यांचा अभिष्टचिंतन सोहळा..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

उद्या राज्यपाल बागडे यांच्या उपस्थितीत शिवाजीराव पंडित यांचा अभिष्टचिंतन सोहळा..

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी-देवेंद्र फडणवीस

June 2, 2026

विश्वकल्याणार्थ ९० दांपत्यांच्या ‘पंचकुंडीय भव्य विष्णूयाग’ संपन्न

June 2, 2026

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.