• Contact Us
  • Home
Wednesday, June 17, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

NO FILE ONLY LIFEओमप्रकाश शेटे यांनी आयुष्यमान भारत मिशनचा पदभार स्वीकारला.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
April 1, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, सामाजिक
0

मुंबई (प्रतिनिधी) मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज रोजी माझी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या “अध्यक्षपदी “ विशेष दर्जा व सुविधेसह निवड करत मोठ्या विश्वासाने जबाबदारी सोपवली आहे. सामान्य रुग्ण केंद्रबिंदू मानून
साहेबांनी दिलेल्या संधीचे सोने करतांना गरजवंताला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारच आहे यात शंका नाही. समितीचा सुधारित शासन निर्णय निर्गमित करीत असताना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेची अंमलबजावणी करण्याचे अधिकार मला दिले आहेत.

मी मागच्या सरकारमध्ये समितीचा कक्ष प्रमुख या नात्याने एक वर्षामधे राज्यातील २८ जिल्ह्यांचा दौरा केला होता. योजनेमार्फत उपचार होण्यासाठी रुग्णांना व हॉस्पिटलला प्रत्यक्षात येत असलेल्या अडचणी व वास्तव परिस्थिती याचा अभ्यास करत एक छोटासा अहवाल तयार केलेला आहे. योजनेतील अनेक त्रुटी मला मान्य आहेत. २०१३ मध्ये सुरू झालेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नंतर २०१४ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असे नामकरण करण्यात आले. मात्र मागील अकरा – बारा वर्षाच्या काळामध्ये आधुनिक उपचार पद्धती व उपचाराच्या खर्चामध्ये प्रचंड वाढ झाली आहे याचा प्रामुख्याने विचार होणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही, पर्यायाने रुग्णांवर योजनेतून उपचार करण्यासाठी अनेक हॉस्पीटल असमर्थता दर्शवतात. अंगीकृत असलेल्या रुग्णालयाने नाकारलेल्या रुग्णाना प्रत्यक्षात उपचार मिळवून देण्यासाठी मी प्रचंड अभ्यास करुन त्यावर उपाय शोधण्यासाठी संपूर्ण मसुदा तयार केलेला आहे. योजनेच्या पॅकेजचे दर पत्रक यामध्ये अमुलाग्र बदल करावा लागेल, परंतु काही रुग्णालय हे अनेक रुग्णांना नाहक त्रास देत योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्याचे प्रकार पण निदर्शनास आले आहेत. एखाद्या योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत द्यायचं म्हटलं की सुवर्णमध्य साधता आला पाहिजे.
माझ्या डोळ्यासमोर ध्येय आहे @रुग्ण आणि रुग्णालय दोन्ही जगले पाहिजेत”.योजनेत असलेल्या त्रुटी मान्य करत माननीय मुख्यमंत्र्यांना सर्व बाबी अवगत केल्यानंतर संदेश दिला आहे की, “आरोग्याबाबत महाराष्ट्र आता थांबणार नाही”.आयुष्यामध्ये प्रत्येक दिलेल्या जबाबदारीचं सोनं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाच आहे.. या जबाबदारीचे देखील भान ठेवत सुरुवात म्हणजे देवेंद्रजींनी पालकत्व स्वीकारलेल्या आदिवासी भागातील “गडचिरोली “जिल्ह्यापासून करणार आहे. या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ देण्यासाठी वाटेल ते परिश्रम करायची तयारी ठेवली आहे. मला ठाऊक आहे, सुरुवातीचा काळ कठीण आहे परंतु अशक्य नाही. येणाऱ्या काळामध्ये काही चांगले व काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. परंतु माझा हेतू शुद्ध असल्यामुळे अडचणीला पूर्ण ताकदीनिशी सामोरे जाण्याची तयारी आहे.
आज पासून सुरुवात करतोय, वेळ किती लागेल सांगता येत नाही. परंतु आणीबाणीच्या वेळेमध्ये सामान्य व्यक्तींना लाभ देण्याकरिता मा.फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने नवे मिशन सुरू करत आहोत. No file only Life
धन्यवाद ….
मा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी
मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब
उपमुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब
उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब
विशेष आभार
मा. रवींद्रजी चव्हाण
मा.आ. अतुलबाबा भोसले.

आयुष्यमान टोल फ्री नंबर
18002332200

Previous Post

देव’दूत परतला ; डॉ.ओमप्रकाश शेटेंची आयुष्मानच्या अध्यक्षपदी निवड .

Next Post

कर्तुत्ववान माऊलीचा,भाग्यवान “शिवसंग्राम”

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

कर्तुत्ववान माऊलीचा,भाग्यवान "शिवसंग्राम"

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी-देवेंद्र फडणवीस

June 2, 2026

विश्वकल्याणार्थ ९० दांपत्यांच्या ‘पंचकुंडीय भव्य विष्णूयाग’ संपन्न

June 2, 2026

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.