• Contact Us
  • Home
Wednesday, June 17, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

“मेरे पास देवेंद्र फडणवीस है ‘ च्या डायलॉगला “मै शिवगामी हू” ने उत्तर..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
February 5, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, बीड जिल्हा
0

आष्टी -” मेरे पास देवेंद्र फडणवीस है” या सुरेश धस यांच्या डायलॉगला “मी शिवगामी आहे आणि या नात्याने देवेंद्र फडणवीस यांची आई आहे” या डायलॉगने पंकजाताई मुंडे यांनी उत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजकिय मतभेद बाजूला ठेवत दिलखुलास भाषण केले.आ.सुरेश धस यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण केले,ते म्हणाले मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लाडका आहे, त्यामुळे अनेकजण मला विचारतात तुमच्याकडे काय आहे तेव्हा मी सांगतो मेरे पास देवेंद्र फडणवीस है.

तुम्ही पाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करा अशी मागणी आष्टीचे आ. सुरेश धस यांनी केली. त्यासोबतच बीड जिल्ह्यातील वाळू, आणि राख माफियाना मकोका लावा अशी मागणी धस यांनी केली.
आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलावाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. आ सुरेश धस पुढे म्हणाले कि, या प्रकल्पमुळे आष्टी तालुक्यातील दुष्काळ कायमचा मिटणार आहे. यपाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी अधिकची पाणी पुरवठा योजना करावी अशी मागणी त्यांनी केली.

बदनामी केली कोणी ? -धस

फडणवीस साहेब, काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी केली जातं आहे. पन या जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटील, राखमाजी गावडे, केशरकाकु क्षीरसागर, बबनराव ढाकणे, गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेते दिले. या जिल्ह्याने अनेक जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक दिले, पन काही लोकांनी गुंडाना राजश्रय दिला. त्यामुळे राख आणि वाळू माफियाना मकोका लावा अशी मागणी आ धस यांनी केली.

मी शिवगामी-पंकजाताई मुंडे

या भागातले लोक शिवगामी म्हणतात त्या अर्थाने मी देवेंद्र फडणवीस यांची माता आहे, त्यामुळे त्यांच्याप्रति माझ्या मनात ममत्वभाव आणि आदरभाव आहे. सुरेश अण्णा तुम्ही प्रेम केलं मी पण मनापासुन प्रेम करणारी आहे, मेरा वचन ही मेरा शासन है असं म्हणत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सभा गाजवली.

आष्टी येथील कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पंकजाताई मुंडे पुढे म्हणाल्या कि, मी या कार्यक्रमाला येणार कि नाही अशी चर्चा होती, मात्र कार्यक्रम शासकीय आहे अन मी शासनात मंत्री आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. सुरेश अण्णा तुम्ही जयदत्त च्या लग्नाला मला साडीचोळी देऊन निमंत्रण दिलं, मी आले, आता सागरच्या लग्नाला निमंत्रण दिलं तर नक्की येणार.

मला पराभूत करून निवडून आलेले खासदार बजरंग सोनवणे इथे आहेत, बीड जिल्ह्याने अनेकांना संधी दिली. जिल्ह्यात पाच युतीचे आमदार असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आजही महायुतीचे पाच आमदार आहेत आणि फडणवीस मुख्यमंत्री आहेत. हा योगायोग आहे.मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात सुरेश धस यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित सर्वांच्या नावाचा उल्लेख करत जोरदार भाषण केले. त्यांच्या भाषणामुळे धस आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद कमी झाल्याचे चित्र दिसून आले.

Previous Post

दुःखाची तीव्रता संप्रदाय कमी करू शकतो-मस्साजोगमध्ये शिवाजीमहाराज.

Next Post

सुरेश धस आधुनिक भगीरथ;फडणवीसांकडून कौतुकच कौतुक.

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

सुरेश धस आधुनिक भगीरथ;फडणवीसांकडून कौतुकच कौतुक.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी-देवेंद्र फडणवीस

June 2, 2026

विश्वकल्याणार्थ ९० दांपत्यांच्या ‘पंचकुंडीय भव्य विष्णूयाग’ संपन्न

June 2, 2026

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.