• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित ,आता मुंबईत लढा.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 30, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, राज्य
0

जालना (प्रतिनिधी) आ.सुरेश धस यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी आपले सातवे आमरण उपोषण सोडले असून या पुढे उपोषण नाही तर मुंबईत दोन कोटी मराठयांचे थेट आंदोलन करण्यात येईल असा इशारा सरकारला दिला आहे.उपोषण सोडण्यापूर्वी ते म्हणाले की, सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी हे मूळ दुखणं आहे. तीन-चार कामं करतो म्हणालेत. 2004 चा कायदा दुरूस्त करा. राज्यातला सरसकट मराठा कुणबी आहे. या चार – पाच मागण्या आजही मंजूर करायला तयार आहेत, मात्र सग्या सोयऱ्यांसाठी काही हरकती आल्या आहेत, त्यासाठी महिन्याचा कालावधी लागेल, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवसहोता . तेथे आमदार सुरेश धस उपस्थित झाल्यानंतर त्यांच्यातही चर्चा झाली. शिंदे समितीच्या नोंदी सापडल्यात, अंमलबजावणी कधी करणार असा सवाल मनोज जरांगे यांनी आमदार सुरेश धस यांना विचारला.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पांचाळ यांनी शासनाचं लेखी पत्र आंदोलनस्थळी घेवून आले . त्यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली. उपोषणाच्या आठ मागण्या शासनाकडे केल्या होत्या. त्यापैकी मुख्यमंत्री फडणवीसांनी चार मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवली. जीडीपीकडून चार मागण्यांसाठी मान्यता देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे समितीची मागणीबाबत सरकार सकारात्मकता आहे असेही ते म्हणाले.

शिंदे समिती बरखास्त- जरांगे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ देण्याची कार्यवाही सुरू आहे, गॅझेट संदर्भातील मागणी, मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे तपासून मागे घेण्याबाबत उचित कारवाई घेण्यात येईल, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर स्थापन केलेल्या कक्षामार्फत काम सुरू राहील आणि त्याला गती देण्यात येईल, असं आश्वासन राज्य शासन आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलंय. यासोबत मागण्यांची दखल घेतल्यामुळं सुरू केलेलं उपोषण मनोज जरांगे यांनी मागे घ्यावं, अशी विनंती करण्यात आली.

ईडब्लुएसच्या माध्यमातून अॅडमिशन झालेले तसेच ठेवावे, काही मराठ्यांच्या तरूणांच्या आत्महत्या झाली, त्यांना 10 लाखांची मदत मिळालेली नाही, ते देण्यात यावी. सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्हाला हवीच आहे. जर नाही झालं तर तारीख जाहीर करू, मुंबईकडे निघू असा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिलाय. यावेळी दोन कोटी मराठे दिसणार. पोलिसांनी हाणलं तर मंत्री अन् त्यांची पोर धरायची, असं देखील मनोज जरांगे म्हणाले, आपण हे आंदोलन स्थगित करतोय, बंद करीत नाही असं देखील मनोज जरांगे म्हणाले. यापुढे उपोषण होणार नाही, समोरासमोर लढाई होणार असं त्यांनी जाहीर केले आहे.

Previous Post

मुंडे बंधू-भगिनीसह साऱ्या बीडकरांना सोबत घेऊन काम करणार-अजित पवार.

Next Post

मीडिया ट्रायलने बीड जिल्ह्याची नाहक बदनामी-धनंजय मुंडे विस्ताराने बोलले.

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

मीडिया ट्रायलने बीड जिल्ह्याची नाहक बदनामी-धनंजय मुंडे विस्ताराने बोलले.

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.