• Contact Us
  • Home
Wednesday, June 24, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 18, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, गुन्हे
0

बीड (प्रतिनिधी) मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील सहा आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत आहे. यामुळे त्यांना आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.संतोष देशमुख यांच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक असलेल्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.आरोपींना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, या हत्याप्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे या आरोपींचा समावेश आहे. कोर्टात या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा घेण्यात आली. सरकारी वकीलांनी आरोपींची पोलीस कोठडी मागितली नाही. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय. याप्रकरणी आरोपी आता जामीनासाठी अर्ज दाखल करू शकतात.

वाल्मीक कराडच्या पोलीस कोठडीवर बीडच्या न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना न्यायालय परिसरातच जोरदार घोषणाबाजी झाली होती. दोन गट समोरासमोर आल्याने एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे पोलिसांना या ठिकाणी सौम्य लाठीमारदेखील करावा लागला.

सुधीर सांगळे व सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे हे माजलगाव येथील पोलीस कोठडीत आहेत, तर जयराम साठे, प्रतीक घुले व महेश केदार गेवराई पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहेत. न्यायालय आवारात सुनावणी वेळी होत असलेली गर्दी पाहता पोलीस प्रशासनाकडून खबरदारी देखील घेतली होती. सुरेखा पाटील यांच्या निकालानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

दरम्यान वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडे वाचवतात असा आरोप आ संदीप क्षीरसागर यांनी केला आहे,त्यांनी म्हंटले आहे की,”मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतोय की, एकतर मास्टरमाईंड म्हणून ते आहेत. त्यांना धनंजय मुंडेंचं संरक्षण मिळत आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. वाल्मिक कराड ज्या पद्धतीने सरेंडर होतात आणि प्रशासनाला समोर जातात. सरेंडर झाल्यावर अंगावर गमछा, हातात दोरे असतात, तशीच ट्रींटमेंट त्यांना भेटते. त्यांच्यापर्यंत तपास आला की थांबतो. हा विषय संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. त्या कालावधीमधले मोबाईलचे सर्व सीडीआर तापसले, तर सर्वकाही लक्षात येईल”, अशी खळबळजनक प्रतिक्रिया आमदार संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Previous Post

आठव्या वेतन आयोगामुळे पगार किती वाढणार?

Next Post

बीडसह पुण्याचा कारभार अजितदादाकडे;पंकजाताई जालन्याच्या पालकमंत्री

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

बीडसह पुण्याचा कारभार अजितदादाकडे;पंकजाताई जालन्याच्या पालकमंत्री

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी-देवेंद्र फडणवीस

June 2, 2026

विश्वकल्याणार्थ ९० दांपत्यांच्या ‘पंचकुंडीय भव्य विष्णूयाग’ संपन्न

June 2, 2026

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.