• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

मला वाटतं पांडुरंगा तू निवडणूकीला उभं राहावं-संकर्षणची कविता…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 30, 2024
in व्यक्ती विशेष
0

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची एक कविता सध्या चांगलीच गाजताना दिसते आहे. संकर्षण कऱ्हाडे एका माध्यम कार्यालयात गेला असताना तिथे त्यानं सादर केलेली एक कविता सध्या चांगलीच व्हायरल होते आहे.

संकर्षणची कविता ….

सगळी गावं तुझीच आहेत,
तू अर्ज भरून पाहावं…
मला वाटतं पांडुरंगा तू
एकदा निवडणुकीला उभं राहावं…

मग ना पावसातल्या सभा,
ना प्रचाराचा घाम,
तुझे स्टारप्रचारक देवा
ग्यानबा तुकाराम…

प्रचाराच्या जाहिरातीत
ओव्या कानी पडतील,
बॅनर बघून विट येण्यापेक्षा
हात जोडले जातील…

सगळं सुखाचं होईल देवा
विपरीत काही घडणार नाही,
तू सगळ्यांचा असल्यानं
एकही मत जात पाहून पडणार नाही

तुझा कुणी विरोधक नसल्यानं
सगळ्यांना बरंच वाटंल,
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?
हे कोडंही लवकर सुटल…

पहिली टर्म असली तरी,
बिनविरोध येशील,
भल्याभल्यांना तुझ्या
मंत्रिमंडळात घेशील…

पहिलाच निर्णय
देवा असा घे, कायद्या सोबत,
गृहखातं छत्रपती शिवाजी महाराजांना दे

मग काय टाप कुणाची
कोण कायदा हातात घेईल?
एका नजरेत देवा सगळा
महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल

लाडक्या भावांवरचं समान प्रेम
जिचं आदर्श म्हणून पाहावं,
त्या मुक्ताईकडं देवा
महिला व बालविकास हे खातं जावं…

साक्षरतेचे तर देवा काय दिवस येतील,
बुद्धीला वैभव म्हणणारे ज्ञानदेव शिक्षण मंत्री होतील

अरे पाणी ज्यांच्या गाथेला तारून
जे स्वत: खाली बुडलं…
जे सदेह आले स्वर्ग
आणि तू दार उघडलं…

त्या तुकोबांच्या दे पुन्हा
हिशोबाच्या वह्या
आणि अर्थमंत्री म्हणून
ताबडतोब घे त्यांच्या सह्या…

एकदम झाला आवाज हो..
लखलख वीज कडाडली…
वीटेवरचे सावळी माऊली
माझ्यावर चिडली

काय लावली तू ही बडबडे…
हे सगळं होणं अशक्य आणि अवघडहे…

या थोरांना मंत्री करुन
तू मला सीएम करतो, हो रे…
राजकारणात यांच्या नावाचा
होतो तेवढा वापर पुरे…

राष्ट्राच्या भल्यासाठी बोलतोय म्हणून ऐकतोय,
ऐक आता एक उपाय मन लावून सांगतोय…
माऊलीच्या रुपातला विठ्ठल बापासाराखा वागला…
जबाबदारीनं राष्ट्रासाठी पुढं बोलू लागला…
मला म्हणाला गाथा, ज्ञानेश्वरी, शिवचरित्र तुम्ही कुणी वाचता?
मग कसं काय रे त्या जयंत्यांना तुम्ही डीजे लावून नाचतात…

या सर्वांना तुम्ही सोयीनुसार जातींमध्ये वाटलं…
डोक्यावर घेतलं तुम्ही डोक्यामध्ये नाही घेतलं…
प्रत्येकात तुका-शिवाजी आहे जर विचारांचा घेतला वसा…
सुराज्यासाठीच काम करा, मग कुणीही खुर्चीत बसा…

कर्तृत्वाची वेळ आहे आता, नको नुसती बडबड
आधी मतदानाला वारी समजून तू घराबाहेर पड…

आम्ही सगळे पाठीशी आहोत, तुम्ही खुशाल राहा…
समोर महाराष्ट्र उभाय त्याच्यात पांडुरंग पाहा…

Previous Post

मतदान का वाढले? एस.चोक्कलिंगम यांनी केले स्पष्ट…

Next Post

ईव्हीएमवर निवडून आलेल्या खा. प्रियांका गांधी राजीनामा देणार का?-भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

ईव्हीएमवर निवडून आलेल्या खा. प्रियांका गांधी राजीनामा देणार का?-भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी..

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.