• Contact Us
  • Home
Thursday, June 25, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

राजेश टोपे पडल्याचा आनंद आहे ; जरांगेंवर हकेंचे टीकास्त्र….

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 25, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला असून महाविकास आघाडीची अक्षरश:धुळधाण झाली. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा पॅटर्न फ्लॉप ठरल्याने आणि ओबीसी एकवटल्याने मविआला मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे.महायुतीच्या या विजयानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर जोरदार टीका केली.तसेच महायुती सरकारकडे त्यांनी मंत्रीपदाचीही मागणी केली आहे.

काय म्हणाले लक्ष्मण हाके….

मनोज जरांगे पाटील यांना लोक कंटाळले आहेत. त्यांनी 130 जागा पाडायची भाषण केली, जिथं मेसेज दिला तिथं लोक मोठ्या मताधिक्याने लोक निवडून आले आहेत. जरांगे खोटं बोलत आहेत. मी जिथं सभा घेतल्या तिकडे चांगली उमेदवारांना मत पडली आहेत.आता मनोज जरांगेंवर ही शेवटची पत्रकार परिषद घेत आहे, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.

‘खुळचट बावळट जरांगे काहीही बोलत आहेत. आम्ही राजेश टोपेला पाडलं, लबाड माणूस आहे. निवडणूक निकाल ही जरांगे यांना चपराक आहे, आम्ही ओबीसीला जवळ म्हणणारी माणसे आहेत. मी जाहीर भूमिका घेतली होती महायुतीची सुपारी. बाप्पा सोनवणे निवडून आले तेव्हा ते म्हणत होते मी जरांगे मुळे निवडून आलो. मला विधान परिषद काय कॅबिनेट मंत्रीपद हवे आहे. गृहमंत्री, अर्थमंत्री किंवा केंद्रीयमंत्रीपद काहीतरी द्यायला हवे. मी अर्ध्या समाजाचे प्रतिनिधित्व करतोय. अशी सर्वात मोठी मागणीही त्यांनी केली आहे.

‘राजेश टोपे नावाचा माणूस पडला याचा मला आनंद आहे. रोहित पवारचेही आम्ही कान कापलेत. आम्ही उघडपणे महायुतीचे काम केले. आता कोणीही मुख्यमंत्री व्हावे, आम्ही आमचे काम केले आहे. मी महायुतीची जाहीर भूमिका घेतली. जरांगेंनीही शरद पवार यांची भूमिका घेतली होती. मी जिथे सभा घेतल्या तिथे भरभरुन मते मिळालीत, अशी टीका करत द्यायचे असेल तर कॅबिनेट मंत्रीपद द्या, विधानपरिषद वगेरे नको, ओबीसी चळवळीला चिल्लर समजू नका,’ असा इशाराhi त्यांनी यावेळी दिला.

Previous Post

भारताचा कांगारुवर विजय…

Next Post

वॉर्नर,पड्डीकल अनसोल्ड,भुवनेश्वरला मोठी किंमत…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

वॉर्नर,पड्डीकल अनसोल्ड,भुवनेश्वरला मोठी किंमत…

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी-देवेंद्र फडणवीस

June 2, 2026

विश्वकल्याणार्थ ९० दांपत्यांच्या ‘पंचकुंडीय भव्य विष्णूयाग’ संपन्न

June 2, 2026

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.