• Contact Us
  • Home
Saturday, February 7, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

आ.संदीप क्षीरसागर नागरिकांच्या मदतीसाठी सरसावले

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
September 22, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा
0


बीड दि.२२ (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यासह तालुक्यात अतिवृत्ती झाल्याने आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे बीड मतदार संघात अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थितीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या पूरजन्य ठिकाणी बीड विधानसभेचे आ.संदीप क्षीरसागर हे नागरिकांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. बीड शहरातील इस्लामपुरा अतिवृष्टीमुळे रस्ता वाहून गेला होता. त्याभागातील शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचण येत होती. त्या भागातील नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी घटनास्थळी उभे राहून बीड नगरपालिकेच्या यंत्रणेकडून प्रत्यक्षात काम करून घेतले.

बीड मतदार संघातील साक्षाळपिंपरी येथील सिंदफणा नदीला मोठा पूर आला होता. संदीप भैय्यांनी त्याठिकाणी जाऊन गावातील ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना धीर देऊन या अतिवृष्टीच्या काळात कोणताही धोकादायक प्रवास न करण्याचे आवाहन केले. शिरापूर गात या ठिकाणी देखील अतिवृष्टी झाल्याने पूर आला होता. या पुरात काही नागरिक अडकले होते. याची माहिती मिळताच संदीप क्षीरसागर यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आपत्ती निवारण विभागाच्या मदतीने पुरात अडकलेल्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. या आपत्तीमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासन व कार्यकर्त्ये अहोरात्र प्रयत्न करत आहेत.संकटाच्या काळात धीर सोडू नका मी आपल्या सोबत असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी नागरिकांना धीर दिला.
चौकट
घटनास्थळावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांना तातडीने केला संपर्क
या सर्व परिस्थितीची गंभीरता पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांना संदीप क्षीरसागर यांनी तातडीने संपर्क करून परिस्थितीबद्दल माहिती देत आपत्ती व्यवस्थापनाकडून मदत देण्याची विनंती केली. अजित दादांनी पण परिस्थितीचे गांभीर्य समजून बीडच्या जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना आदेश देऊन व्यवस्थापनाची टीम उपलब्ध करून दिली.
चौकट
संदीप भैय्यांमुळे आईसह एका लहान बाळाचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
बीड मतदार संघातील शिरापूर गात येथे पुराच्या पाण्यात काही नागरिक अडकले होते. त्यामध्ये एका महिलेसह लहान बाळ अडकल्याची माहिती मिळताच आ.संदीप क्षीरसागर हे तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी आपत्ती निवारण विभागाच्या मदतीने सर्व नागरिकांसह पुरात अडकलेल्या एक महिलेसह तिच्या लहान बाळाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले.

Previous Post

बीडकरांची रेल्वेची स्वप्नपूर्ती… दशकांची प्रतीक्षा संपली!

Next Post

॥  विजयादशमी  ॥

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

॥  विजयादशमी  ॥

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.