• Contact Us
  • Home
Friday, February 6, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

बीडसह पुण्याचा कारभार अजितदादाकडे;पंकजाताई जालन्याच्या पालकमंत्री

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 18, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, राजकारण
0

मुंबई (प्रतिनिधी) महायुती सरकारने अखेर बहुप्रतिक्षित पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांना चांगलाच फटका बसला आहे.धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. बीडचे पालकमंत्री अजित पवार असणार आहे. अजितदादांकडे बीड आणि पुण्याचे पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहे.राज्यात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. कोणत्या मंत्र्यांला कोणते खाते मिळणार हा ही विषय संपुष्टात आला तोच कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार हा प्रश्न चर्चेला आला होता. महायुतीमध्ये खातेवाटपाच्या तिढ्यानंतर पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. आता मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढला आहे. बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण?

गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे – एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
सिंधुदुर्ग- नितेश राणे
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे – एकनाथ शिंदे
अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
वाशिम – हसन मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत पाटील
सातारा -शंभुराजे देसाई
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट
जळगाव – गुलाबराव पाटील
यवतमाळ – संजय राठोड
कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ
अकोला – आकाश फुंडकर
भंडारा – संजय सावकारे

बुलढाणा – मंकरंद जाधव
चंद्रपूर – अशोक ऊईके
धाराशीव – प्रताप सरनाईक
धुळे – जयकुमार रावल
गोंदिया – बाबासाहेब पाटील
हिंगोली – नरहरी झिरवळ
लातूर – शिवेंद्रसिंग भोसले
मुंबई शहर – एकनाथ शिंदे
नांदेड – अतुल सावे
नंदुरबार – मानिकराव कोकाटे
नाशिक – गिरीश महाजन
पालघर – गणेश नाईक
परभणी – मेघना बोर्डीकर
रायगड – अदिती तटकरे
सिंधुदुर्ग- नितेश राणे
रत्नागिरी – उदय सामंत
सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
जालना – पंकजा मुंडे

सह पालकमंत्री कोण?

मुंबई उपनगर -आशिष शेलार पालकमंत्री
मुंबई उपनगर – सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
कोल्हापूर – प्रकाश आबिटकर पालकमंत्री
कोल्हापूर – सह पालकमंत्री माधुरी मिसाळ

Previous Post

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी..

Next Post

शमी परतला,हर्षित राणाही संघात,भारतीय संघ जाहीर.

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

शमी परतला,हर्षित राणाही संघात,भारतीय संघ जाहीर.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.