• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

ईव्हीएमवर निवडून आलेल्या खा. प्रियांका गांधी राजीनामा देणार का?-भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 30, 2024
in राजकारण
0

बीड (प्रतिनिधी) राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमताने जनादेश मिळाल्यानंतर यशाचे खापर विरोधकांनी ईव्हीएम मशिनवर नेहमीप्रमाणे फोडले असुन सद्यस्थितीत मविआ नेत्यांची सुरू असलेली आरडाओरड म्हणजे बिनपैशाचा तमाशा होय. आपला तो बबल्या, दुसर्‍याचं कार्ट ही निती विरोधकांची असुन विजयाला ईव्हीएम मशिनच जबाबदार असेल तर मग वायनाड लोकसभेत विजयी झालेल्या काँग्रेस नेत्या खा.प्रियंका गांधी यांचा विजय बोगस समाजावा का? असं म्हणत भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी फारच ईव्हीएम मशिनवर राग असेल तर प्रियांका गांधींचा राजीनामा मल्लिकार्जुन खरगे का घेत नाहीत? तर जितेंद्र आवाडांनीही स्वाभिमानाने राजीनामा द्यावा असं त्यांनी म्हटलं.


प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकताना राज्यात मागच्या अडीच वर्षात महायुतीच्या सरकारने केलेली अभुतपुर्व कामगिरी जनसामान्य जनतेच्या हिताचं काम आणि लाडक्या बहिणीसाठी सुरू केलेली योजना हेच खर्‍या अर्थाने यशामागचं कवित्व आहे. मविआच्या नेत्यांना आपण सत्तेत येवु याची खात्री का पटली होती? कारण मागच्या दोन अडीच वर्षात राज्यात सत्ताधार्‍यांची केवळ बदनामी केल्याशिवाय त्यांनी सकारात्मक राजकारण केलं नाही. वास्तविक पहाता विरोधकांच्या अपयशाचे धनी खा.संजय राऊत, नाना पटोले, जितेंद्र आवाड यांच्यासारखे वाचाळवीर असुन खरं आत्मपरीक्षण मविआच्या नेत्यांनी करायला हवं. राज्यातील सर्वसामान्य जनता मात्र महायुतीच्या अर्थात सत्ताधार्‍यांवर प्रचंड विश्वास टाकत खंबीरपणे पाठीमागे उभी राहिली आणि जनादेश अभुतपुर्व यशाने मिळवुन दिला. राजकारण सकारात्मक करायला हवं पण आम्हाला मिळालेला विजय विरोधकांना सहन होईना. वास्तविक पहाता राज्यातील जनतेने राहुल गांधी, शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांना त्यांची जागाच दाखवुन दिली असा जनादेश महायुतीला दिला. निकाल आल्यानंतर अपयशाचं आत्मपरीक्षण न करता ही मंडळी आता ईव्हीएमच्या नावाने नेहमीप्रमाणे बिनपैशाचा तमाशा करू लागली. त्यात मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातील सर्व मविआच्या नेत्यांनी तमाशात घेतलेला सहभाग आश्चर्यकारक म्हणावा लागेल. आपला तो बबल्या, दुसर्‍याचं कारटं ही निती विरोधकांची नेहमीच राहिली. कर्नाटकासह अनेक राज्यात काँग्रेसला विजय मिळाला. तिथं ईव्हिएम मशिन चांगली वाटते. एवढंच नव्हे तर याच निवडणुकी दरम्यान वायनाड लोकसभा मतदारसंघात खा. प्रियंका गांधी प्रचंड मतांनी निवडुन आल्या. नांदेड लोकसभेची जागा काँग्रेसला मिळाली. एवढेच काय तर मविआला देखील बोटावर मोजता येतील एवढ्या विधानसभेच्या जागा मिळाल्या. त्यांचा विजय त्यांना ईव्हीएमवर मान्यच कसा होतो? राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मोठ्याने ओरडून ईव्हीएमच्या नावाने गळा काढु लागले. देशभरात आंदोलन उभा करण्याची घोषणा केली. प्रश्न हा पडतो मग वायनाडमधुन विजयी झालेल्या प्रियांका गांधी यांचा अगोदर राजीनामा काँग्रेसनं घ्यायला हवा. ज्यामुळे ईव्हीएम मशिन तुम्हाला मान्य नाही याची सिद्धता होईल. जितेंद्र आवाडसारखे पोपटपंची आता करू लागले त्यांनीही खरं तर राजीनामा आधी अगोदर द्यायला हवा. ईव्हीएमच्या नावाने विरोधकांची ओरड म्हणजे कुस्तीच्या मैदानात नुरा कुस्ती निकाली निघुन देखील पाट लागलीच नाही असं पराभुत होणार्‍या पहिलवानाकडून म्हणावी तशी ओरड विरोधक करताना दिसतात.

Previous Post

मला वाटतं पांडुरंगा तू निवडणूकीला उभं राहावं-संकर्षणची कविता…

Next Post

तिसऱ्याच दिवशीच बाबा आढाव यांच्या उपोषणाचीसमाप्ती ; अजितदादांनी सारे काही सांगितले..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

तिसऱ्याच दिवशीच बाबा आढाव यांच्या उपोषणाचीसमाप्ती ; अजितदादांनी सारे काही सांगितले..

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.