नमस्कार…!
दि.३१|१०|२०२४
अथवा
दि.०१|०११|२०२४
*॥ श्रीमहालक्ष्मी – कुबेर पूजन ॥*
🟣 आश्विन अमावस्येला प्रातःकाळी अभ्यंग स्नान करावे.
(कालादर्श)
🟣 सूर्य आणि चंद्र दोघेही “स्वाती” नक्षत्रात असलेल्या दिवशी “पंचकल्क” किंवा “पंचत्वक्” (अश्वत्थ, उंबर, प्लक्ष(पिंपरी), आम्र, वट यांच्या त्वचा (साली) घातलेल्या पाण्याने) सहित स्नान करणारा व स्त्रियांकडून नीरांजन करवून घेणारा आणि (सायंकाळी) लक्ष्मीपूजन करणारा व्यक्ती *विपुल लक्ष्मी प्राप्त करणारा होतो.*
तसेच हे करणारा व्यक्ती *लक्ष्मी रहित होतच नाही.* भलेही हा दिवस अमावस्या, संक्रांती, व्यतिपात , रविवार , दिनक्षय इत्यादी दोषांनी युक्त असो.
(पुष्कर पुराण & ब्रह्म पुराण -आश्वयुग् दर्शन & कश्यप संहिता )
🟣 लक्ष्मी पूजन कधी करावे ❓❓या विषयी..
*आपण नित्य वापरत असलेल्या पंचांगानुसार ; आपापल्या गावाच्या सूर्यास्तानंतर २४ मिनिटांपर्यंत अमावस्या ज्या सायंकाळी असेल त्या दिवशी हे पूजनाचे कार्य करावे.*
(काशीस्थ धर्मसभा निर्णय)
🟣 श्रीलक्ष्मी- कुबेर पूजा मुहूर्त:- १७.५९ ते २०.३०
(सूर्यसिद्धांतीय पंचांगानुसार)
🟣सायंकाळी आचमन-देशकालाचा उच्चार करून;पुढील प्रमाणे संकल्प करावा.
*मम श्रीमहालक्ष्मी प्रीतिद्वारा अलक्ष्मी परिहार पूर्वकं विपुलश्रीप्राप्ति सन्मंगल महैश्वर्य कुलाऽभ्युदय सुख-समृध्याऽदि कल्पोक्त फलसिध्यर्थं श्रीलक्ष्मी पूजनं – कुबेरपूजनं च करिष्ये ।*
🟣 असा संकल्प करून; आसन विधी,न्यास , कलशपूजा, श्रीगणपती पूजा इत्यादी करावी.
🟣 श्रीलक्ष्मी- कुबेर यांचे आवाहन करून; *॥श्रीलक्ष्मी-कुबेराभ्यां नमः ॥* या मंत्राने ; तसेच अंगपूजा,पत्रपूजा या सह देवीची षोळशोपचार पूजा करावी.
(पूजा पद्धती ग्रंथात विस्तृत असलेने सर्व पूजा टाईप करून पाठविणे समयाऽभावी शक्य होत नाही.)
🟣 या नंतर पुढील मंत्रांनी देवीची प्रार्थना करावी.
*卐 लक्ष्मी प्रार्थना मंत्र:-*
१} *कमला चपला लक्ष्मी: चलाभूति: हरिप्रिया ।*
*पद्मा पद्मालया संपदुच्चै: श्री: पद्मधारिणी ॥*
२} *नमस्ते सर्व देवानां वरदासि हरिप्रिये । या गतिस्त्वत् प्रपन्नानां सामेभूयात् त्वदर्चनात् ॥*
३} *या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता ।*
*नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनम:॥*
*卐 श्रीकुबेर प्रार्थना मंत्र:-*
*धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च ।*
*भवंतु त्वत्प्रसादान्मे धनधान्यादि संपदः ॥*
🟣 या पूजेमध्ये ; लवंग-विलायची- साखरयुक्त गाईच्या दुधाने अथवा तुपाने युक्त लाडू चा नैवेद्य करावा असे आहे.
तथापि गुडमिश्र धान्य, धणे, खडीसाखर, साळीच्या लाह्या, बत्तासे इ.अर्पण करण्याची (शिष्टांची) प्रथा आहे.
(पूजासमुच्चय)
🟣 ब्राह्मणांना उपहार अर्पावा. *भूयसीदक्षिणा* देऊन सम्मान करावा .
*लक्ष्मी पूजेनंतर बरेच लोक पूजा करणा-या ब्राह्मणांना दक्षिणा देत नाहीत.वास्तविक पाहता हे योग्य नाही. पूजोत्तर दक्षिणा देऊ नये; याला कोणताही शास्त्राधारतर नाहीच; उलटपक्षी (पूजा समाप्ती नंतर) लगेचच दक्षिणा न देणे (कर्मफलप्राप्तीसाठी) दोषावह आहे.*
*तसेच ; जर दुसरे दिवशी दक्षिणा देणार असाल तर; ती दक्षिणा दुप्पट करून द्यावी लागते.*
*॥ एकरात्री व्यतीतेतु तद्दक्षिणा द्विगुणं भवेत् ॥*
(देवीपुराण)
🟣पुराण- प्रवचन- गीतगायन इ. जागरण करावे.
(पूजासमुच्चय)
🟣 *निशीथकाळी अलक्ष्मी निस्सारण करावे.*
(या २०२४ च्या रात्रीचा निशीथकाळ:- मध्यरात्री ११.५३ ते १२.४३ पर्यंत आहे.)
🟣 अलक्ष्मी निस्सारणाचा विधी:-
मध्यरात्री निद्रेने लोकांचे अर्धे डोळे मिटलेले असताना घरातील (सुवासिनी) स्त्रियांनी सूप व डिंडिम (दवंडी) वाजवून मोठ्या आनंदाने आपापल्या घरांतून अंगणातून *”अलक्ष्मी”* बाहेर घालवावी.
(भविष्य पुराण- मदनरत्न)
🟣 प्रत्यक्ष कर्म करण्याची पद्धती येणेप्रमाणे…
अलक्ष्मी निस्सारण करणें म्हणजे ;लक्ष्मी पूजेच्या वेळी ठेवलेल्या झाडूने घराच्या मागील भिंतीला झाडू लाऊन (म्हणजे मागील भिंतीपासून ) तसाच तो झाडू जमिनीवर लावत घराच्या उंब-या पर्यंत केर झाडत नेऊन ; केर – कचरा (उंब-याच्या) बाहेर झटकून द्यावा.
हे करत असताना ; (हे कचरा बाहेर झटकण्याची) क्रिया करणा-या व्यक्तीने… *॥ अलक्ष्मीं निःसारयामि ॥* असे म्हणत जावे.
आणि तसेच त्या वेळी घरातील महिलांनी (धान्य पाखडण्याचे) सूप मोठ्याने वाजवावे.)
🟣 या अमावस्येला ; बाल अथवा रोगी व्यक्ती सोडता इतरांनी दिवसा भोजन करू नये.
(भविष्य पुराण – हेमाद्री)
( म्हणून फराळाची व्यवस्था केलेली असते.)
*॥ शुभदीपावली ॥*
वे.शा.सं.अमोलशास्त्री जोशी,
श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
९५११८६९१५५
श्रीगुरुदेव दत्त …!
——-//–///////——-
*॥ अल्प परिचय आणि आवाहन ॥*
वेदमूर्ती अमोलशास्त्री राजाराम जोशी.
प्रधानअध्यापक तथा सचिव; श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
______________________
🟣 श्रीनृसिंहसरस्वती पाठशाळा, श्रीक्षेत्र देवाचीआळंदी. येथे एक तप (बारा वर्षे) गुरूगृही वेदाध्ययन केले.
🟣 गुरुजींच्या आज्ञेने आणि परिजनांच्या त्यागपूर्ण सहयोगाने गत २२ वर्षांपासून; आजतागायत श्रुतिगंध वेदपाठशाळा बीड च्या माध्यमातून अविरत वेदाऽध्यापनाचे कार्य चालू आहे.
🟣 अनेक प्रकारच्या वेदपरिक्षा उत्तीर्ण असून अनेक पुरस्कार प्राप्त आहेत.
🟣 श्रुतिगंध वेदपाठशाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी भारतातील अनेक मान्यताप्राप्त परीक्षेत उत्तुंग यशप्राप्ती करून;विद्वान झालेले आहेत.
🟣असे विद्वान झालेले विद्यार्थी देखील ; वेदअध्यापनाचे कार्य करत आहेत.
🟣अनेक वैदिक सम्मेलनांमध्ये
सक्रिय सहभाग.
🟣 समाजातील सर्व वयोगटातील सर्वसमावेशक संस्कृत शिक्षणार्थींसाठी *ऑनलाईन संस्कृत अध्ययनाचे* कार्य चालू झालेले असून;पहिल्या बॅच ची परीक्षा यशस्वीपणे संपन्न झालेली आहे.
🟣 *या श्रुतिगंध वेदपाठशाळेत; वेद शिक्षण ऑफलाईन तर संस्कृत शिक्षण ऑनलाईन उपलब्ध आहे.*
🟣 *वेदाऽध्ययनासाठी इच्छुक शिक्षणार्थींना अन्न,वस्त्र, निवारा या सोबत च निःशुल्क प्रवेश चालू आहे.*
🟣 *ऑनलाईन संस्कृत शिक्षणार्थींसाठी अत्यल्प मूल्यात सशुल्क अध्ययन उपलब्ध आहे.*
🟣 *इच्छुक शिक्षणार्थींनी ९५११८६९१५५ या क्रमांकावर संपर्क करून; अवश्य लाभ घ्यावा.*
श्रीगुरुदेव दत्त..!