• Contact Us
  • Home
Friday, February 6, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

पाटंगण, वेद घोषाचे हे पवित्र प्रांगण

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 9, 2025
in बीड जिल्हा, सांस्कृतिक
0
उद्यापासून थोरल्या पाटांगणावर वार्षिकोत्सव.



बीड (प्रतिनिधी) धर्मरक्षण, वेदमूर्तींचा सन्मान, वेद घोषाने पवित्र प्रांगणाची ४२५ वर्षाची दिव्य परंपरा असलेले पाटंगण हे संस्थान जनीजनार्दन स्वामींच्या तपश्चर्याची ही तपोभूमी आहे, अशा शब्दात राष्ट्रीय संस्कृत विश्वविद्यालय तिरुपतीचे राधागोविंद त्रिपाठी यांनी पाटंगण संस्थांनच्या कार्यक्रमाची सफलता आणि धर्मरक्षण कामाचा यथोचित गौरव आपल्या मुख्य अतिथी भाषणातून केला.


त्यांच्या शुभहस्ते अद्वैत वेदांत रत्न पं. प्रमोदशास्त्री कुलकर्णी (परभणी )यांचा वै. धुंडीराज महाराज पाटंगणकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा “विद्वन्मणि” हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते .
जे वेदात तेच संतवाङ्मयात, वेद, ऋषी, आचार्य परंपरा संत परंपरेत परिवर्तित झालेली आहे. सर्वात एक वाक्यताच आहे. भेदाभेद किंवा विरोध कुठेही नाही. मोक्षमार्गाचे तत्त्व ,परम कल्याणासाठी भक्तिमार्ग, सर्व स्थळी भगवंत हेच मनाच्या श्लोकातून, तुकोबांच्या अभंगातून किंवा हनुमान चालीसातून आहे, असा महत्त्वपूर्ण संदेश देत वै. धुंडीराज महाराजांची वेदाबद्दलची तळमळ त्यांचे मोठेपण आणि ऋणानुबंधातून आशीर्वाद रुपी हा पुरस्काराचा प्रसाद प्राप्त झाल्याबद्दल चा आनंद आपल्या मनोगतातून पं. प्रमोद शास्त्री यांनी यावेळी व्यक्त केला.


व्यक्ती आपल्या पुरता विकासाचा विचार करतो आहे, व्यक्ती केंद्रीत समाज होतो आहे. संतांची शिकवण समाज आणि राष्ट्र विकासची असते, महाप्रभू चैतन्य स्वामी जगन्नाथाच्या
सेवेत समर्पित राहून कोणतीही इच्छा न ठेवता तुझ्या चरणात सदैव भक्ती रहावी एवढीच अपेक्षा करतात. भौतिक सुखाची इच्छा नसते तिथेच संत दर्शन असते. सतत प्रभू चरणी लीन असावे हेच कार्य, जीवनाचे लक्ष त्यांचे असते. धर्मप्रतिष्ठा आणि कार्यआचरण यासाठी गीतेतून भगवंताने देखील भ्रमित, विचलित मनाला प्रसाद रूपापर्यंतचे शिक्षण दिले आहे. पवित्र आचरणाचा मार्ग वेदाने तोच सांगितलेला आहे आणि ते संत परंपरेने विषाद समाजाला प्रसाद रुपी जीवन परंपरा सांगितलेली आहे.


पं.प्रमोदशात्री म्हणाले की,दादागुरु धर्माधिकारी यांच्या आज्ञेने बासर ला ९६-९७ साली शतचंडी यज्ञाच्या निमित्ताने गीतेवरील प्रवचन प्रसंगातून एक सामान्य विद्यार्थी होतो तेव्हापासून दादांनी लक्षात ठेवून, पुढे वेद सेवेच्या निमित्ताने ऋणानुबंधातून हा पुरस्कार रुपी प्रसाद प्राप्त झालेला आहे .पुरस्काराने कार्य समाप्ती होत नसते तर ती जबाबदारीची जाणीव असते ,पुढील कार्यासाठी प्रेरणा असते, संत एकनाथ पंचकातील थोर संत परंपरेतील एक नाव जनीजनार्दनांचा आशीर्वाद तोही तिरुपती बालाजी भगवान संस्थांच्या उपस्थितीत आज प्राप्त झाला आहे ,अशा भावना आपल्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या.
वृद्धिगंत होत असलेले पाटांगणावरील कार्यक्रमात “दादा” नाही ,ही संवेदना प्रगट करत, वेदाची सेवा, अध्ययन हे सोपं नाही ती एक तपश्चर्य आहे. वेदनारायणामुळे संस्कृती रक्षण होते. वेद मौलिक ठेवा जपायला हवा, ते वैभव आहे. वेदातूनच उत्पत्ती, सामर्थ्य आणि ज्ञान प्राप्ती होते, हे जतन करणाऱ्यांचा सत्कार -गौरव व्हावा ही दृष्टी -परंपरा आणि वारसा पाटंगणकर परिवार जोपासून आहे. संत कुळात जन्म घेऊन एक महात्म्याचेच कार्य दादांनी केले, ते योगी होते, ते माझे मित्र होते अशा भावपूर्ण जिवलग मित्र वै. धुंडीराज महाराज यांच्या स्मृतीला उजाळा ॲड. कालिदासराव नाना थिगळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून दिला.


मठाधिपती श्री. विनायक महाराज, ॲड. भालचंद्र, इंजि.शर्मन आणि पाटांगण परिवाराने सर्वांचे यथोचित स्वागत केले. भगवतगीता सेवेबद्दल सौ.संध्याताई कुलकर्णी (पुणे) याचा मान्यवरांच्या हस्ते पाटंगणाच्या वतीने विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.सुंदर संचलन वेदमूर्ती कृष्णा महाराज रामदासी यांनी केले. मोठ्या संख्येने भाविक भक्त, मातृ शक्ती, समस्त बीडकरांची उपस्थिती यावेळी होती.

Previous Post

न.प.निवडणुका लागल्या, 2 डिसेंबरला मतदान.

Next Post

न.प.निवडणूक प्रक्रिया सुरू.

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

न.प.निवडणूक प्रक्रिया सुरू.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.