• Contact Us
  • Home
Friday, February 6, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
May 28, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, बीड जिल्हा
0

बीड (प्रतिनिधी) हिंदूंच्या धार्मिक संघटनासाठी आधी समस्त जाती एकत्र आल्या पाहिजेत,त्यासाठी सर्वांना समान वागणूक आणि न्याय मिळाला पाहिजे हा विचार मांडून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विविध कृतिशील उपक्रम राबवले आणि त्यातून सामाजिक ऐक्य निर्माण करून प्रखर राष्ट्रवादी विचारांचा प्रभावी प्रसार केला ,स्वधर्माचे जागरण करतांना त्यांनी अन्य कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही असे प्रतिपादन डॉ.सारिका क्षीरसागर यांनी केले.

स्वा. वि.दा. सावरकरांच्या 142 व्या जयंती निमित्त येथील जवाहर कॉलिनीतील स्वा. सावरकरांच्या पुतळ्याला वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.अजिंक्य पांडव यांनी केले तर प्रा.चंद्रकांत मुळे,डॉ.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर,भाजपा प्रदेशकार्यकारणीचे सदस्य सलीम जहाँगीर ,भाजपाचे बीड शहराध्यक्ष अशोक लोढा , शिवसेनेचे नितीन धांडे, गिरीश देशपांडे,डॉ.पी.के.कुलकर्णी,गेवराई भाजपचे अध्यक्ष ऍड.उध्दव रासकर, पत्रकार प्रमोद कुलकर्णी यांनीही स्वा. सावरकरांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे केली. आभारप्रदर्शन महेश वाघमारे यांनी केले. पुढे बोलताना डॉ.सारिका क्षीरसागर म्हणाल्या की, वीर सावरकर हे भारताचे एक महान स्वातंत्र्यसेनानी आणि देशभक्त होते, ज्यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या लढाईत आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आणि काळ्या पाण्यासारखा कठोर, निर्दयी आणि अमानुष छळ सहन केला, तरीही त्यांनी आपली देशभक्ती आणि सेवा सोडली नाही. यासाठी बीडमध्ये स्वा. सावरकरांच्या विचारांना जनमानसात लोकप्रिय करण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहणार आहे. स्वा. सावरकर पुतळा परिसरात सुसज्ज ग्रंथालय आणि भव्य भगवा ध्वज उभारण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला.यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी स्वा. सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ऍड.मिलिंद वाघिरकर, विजय चौधरी, डॉ.गणेश आडगांवकर, ऍड.प्रशांत देशपांडे,ऍड.अमित हसेगावकर, ऍड.जितेंद्र पांडव, श्री.संतोष चिंचोलकर, श्री.त्रिंबक देशपांडे, डॉ.मनोज पोहणेरकर, श्री.संतोष पारगावकर, डॉ.स्वप्नील उन्हाळे, श्रीवल्लभ गोडबोले,श्री.दीपक रुपदे, ऍड.आनंद पाटील, डॉ.राजेश भुसारी,श्री.संदीप खडकिकर, श्री.विजय कोटुळे, श्री.गंगाधरराव देशमुख,श्री.राम कुलकर्णी, श्री.मिलिंद शिवणिकर,डॉ.विनोद मुळे, श्री.एकनाथ टेपाले, श्री.हेमंत जोशी,श्री.संदीप खडकिकर, डॉ.राहुल भालेराव,ऍड.नरेंद्र जवळेकर, श्री.मुकुंद कुलकर्णी, श्री.अभिजित वैद्य,श्री.प्रसाद अंदुरकर,डॉ.राहुल भालेराव, ऍड.सुनील देशमुख,श्री.संजय डोळे,श्री.प्रकाश गोरकर, डॉ.छत्रपती वैरागर,श्री.नरेंद्र देशपांडे,श्री.रत्नाकर कुलकर्णी, श्री.विनायक कुलकर्णी, श्री.प्रकाश चैतन्य,श्री.वैभव देशमुख,श्री.सुनील खजानदार, श्री.संतोष जोशी यांच्यासह सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सोयाबीन, तूर, मुगाची आधारभूत किंमत वाढवली…

Next Post

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.