
बीड ः प्रतिनिधी
राष्ट्रीय युवा दिन, राजमाता जिजाऊ साहेब जयंती तसेच स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून रोटरी परिवार बीड व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने बीडमध्ये ऐच्छिक महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.12 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत श्री.गुरुनानक मंदिर, श्री.स्वामी समर्थ मंदिराजवळ, सह्योग नगर येथे हे शिबीर होणार आहे.
बीड मध्ये प्रथमच सर्व सामाजिक संघटना यांनी एकत्रित येऊन या महा रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आले आहे. गत काही काळापासून जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेवून हे शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.
या शिबिरात शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बीडचे अध्यक्ष – रो.मेघराज पिंगळे, ॅ रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन चे अध्यक्ष – रो.नितीन गोपन, रोटरी क्लब ऑफ बीड सिटीचे अध्यक्ष – सौ.संध्या मिश्रा, बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष – भास्करराव जाधव, कार्याध्यक्ष – अशोक शेटे, बीड डिस्ट्रिक्ट कन्सल्टिंग इंजिनीअर्स असोसिएशन चे अध्यक्ष – दिपक कुलकर्णी, माहेश्वरी प्रगती मंडळ चे अध्यक्ष – सुरेंद्र कासट, बीड शहर व्यापारी संघटनाचे अध्यक्ष – प्रकाश कानगावकर, डेंटल असोसिएशन बीडचे अध्यक्ष – डॉ.उमाशंकर विश्वेकर, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष – अॅड. रोहिदास येवले, भारतीय जैन संघटना बीडचे अध्यक्ष – निलेश ललवाणी, क्रेडाई संघटना बीडचे अध्यक्ष – संतोष जाधव, स्वराज्य मुद्रा सामजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष – सौ अनिताताई भोसले, बीड जिल्हा सीए व टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सीए भानुदास जाधव, पतंजली योग समिती बीडचे प्रांतप्रभारी अॅड.श्रीराम लाखे, योग प्रतिष्ठान बीड चे अध्यक्ष अॅड.प्रशांत माने यांनी केले आहे. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी रो.अक्षय शेटे, रो.बालाजी घरत, रो. नितीन भोसले, रो.गणेश मैड, डॉ.अनिल थोरात हे परिश्रम घेत आहेत.