• Contact Us
  • Home
Thursday, February 5, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रात वीस लाख घरे देणार….

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
December 24, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा, राज्य
0

पुणे(,प्रतिनिधी) भारताचे कृषी मंत्री आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरीबांसाठी मोठी घोषणा केली आहे.पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण गरीबांसाठी 19 लाख 66 हजार घरे यावर्षी देण्यात येणार असल्याची घोषणा चौहान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केली.मी महाराष्ट्राचा जावई आहे. देवेंद्र फडणवीस माझे छोटे भाऊ आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतासाठी देवाचं वरदान आहेत. तर देवाभाऊ महाराष्ट्राच्या जनतेचे जीवन बदलण्यासाठी मुख्यमंत्री झाले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. शरद पवार कृषी मंत्री असताना 23 हजार बजेट होतं ते आता 1 लाख 27 हजार करोड आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे परंतु शेतीची प्रत पुढील पिढीसाठी चांगली राहिली पाहिजे. मी ग्रामविकास मंत्री देखील आहे. प्रत्येक गरिबाकडे स्वतःचं पक्क घर असलं पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आमचा प्रयत्न आहे. तिसऱ्यांदा मोदी सरकार निवडून आले आहे. यापूर्वी 6 लाखपेक्षा अधिक लोकांना घर मिळाली होती. 13 लाख 29 हजार महाराष्ट्रातील गरिबांना घरे मिळणार आहेत.

आता महाराष्ट्राला जवळपास वीस लाख घरे मिळालेली आहेत. पुढील एका वर्षांत ही घरं मिळणार आहेत. ज्यांना यापूर्वी घर मिळाले नाही, त्या सर्वांना स्वतःचे घर भेटणार आहे. ज्यांच्याकडे 2 चाकी गाडी आहे, त्यांनाही प्रधानमंत्री आवास योजनेतून घर भेटणार असल्याची घोषणा आज शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.

माझा महाराष्ट्राशी जिव्हाळ्याचे
संबंध – शिवराजसिंह चौहान

कार्यक्रमावेळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान बोलताना म्हणाले, माझा महाराष्ट्राशी सखोल संबंध आहे. मी महाराष्ट्राचा जावई आहे. मी ग्रामीण विकास मंत्री देखील आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण गरीबांसाठी 19 लाख 66 हजार घरे यावर्षी देण्यात येणार आहेत. देशातील कोणत्याही राज्याला मिळालेल्या राज्यापेक्षा ही संख्या जास्त आहे. आतापर्यंत एका राज्याला एका वर्षात मिळालेली ही सर्वाधिक घरे आहेत अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

Previous Post

पंकजाताईना पर्णकुटी, धनंजय मुंडेना सातपुडा तर बावनकुळेना रामटेक….

Next Post

संस्कार भारतीच्या देवगिरी प्रांत कार्यकारिणीची घोषणा.

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

संस्कार भारतीच्या देवगिरी प्रांत कार्यकारिणीची घोषणा.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.