• Contact Us
  • Home
Sunday, November 30, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

खातेवाटप जाहीर;गृह फडणवीसांकडेच तर अर्थ खाते पुन्हा अजितदादांकडे…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
December 21, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा, राजकारण
0

अखेर महायुती सरकारमध्ये महायुती सरकारमध्ये खातेवाटप झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडेच गृह खातं ठेवलं आहे. महसूल खात्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आली आहे.मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्रात मंत्रिमंडळामधील खातेवाटप अखेर झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात महत्त्वाचे गृहखाते स्वत:कडे ठेवले आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि उत्पादन शुल्क खाते देण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, लाॅ ॲंड ज्युडीशिअरी
एकनाथ शिंदे – नगरविकास, गृहनिर्माण
अजित पवार – अर्थ, राज्य उत्पादन
भाजपकडे असणारी खाती

देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, लाॅ ॲंड ज्युडीशिअरी
चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
राधाकृष्ण विखे- पाटील – जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)
चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री
गिरीश महाजन – जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण)
गणेश नाईक – वनमंत्री
मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास
जयकुमार रावल – मार्केटिंग आणि प्रोटोकॉल
पंकजा मुंडे – पर्यावरण आणि हवामान बदल, ॲनिमल हसबंडरी
अतुल सावे – ओबीसी, डेअरी विकास आणि रिन्युएबल एनर्जी
मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
माधुरी मिसाळ – शहरी विकास, वाहतूक, सामाजिक न्याय
आकाश फुंडकर – कामगार
जयकुमार गोरे – ग्रामविकास आणि पंचायती राज
शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक उपक्रम
आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान

नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
15 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 23 व्या दिवशी 15 डिसेंबर रोजी नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. फडणवीस सरकारमध्ये 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसह ही संख्या 42 झाली आहे. मंत्रिमंडळात एकूण 43 मंत्री शपथ घेऊ शकतात. एक जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. फडणवीस सरकारमध्ये भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातील 9 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांना त्यात स्थान मिळाले नाही. यामध्ये भाजपचे 4, शिवसेनेचे 3, राष्ट्रवादीचे 5 आहेत. 19 नवीन मंत्री झाले. यामध्ये भाजपचे 9, शिवसेनेचे 8 आणि राष्ट्रवादीचे 4 उमेदवार आहेत. याशिवाय 4 महिला (3 भाजप, 1 राष्ट्रवादी) आणि 1 मुस्लिम (राष्ट्रवादी) यांना सरकारमध्ये स्थान मिळाले आहे. सर्वात तरुण मंत्री राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे (36) आहेत, तर सर्वात वयस्कर मंत्री भाजपचे गणेश नाईक (74) आहेत.

तर अर्थ खाते, राज्य उत्पादन शुल्क हे अजित पवारांकडे देण्यात आले आहे. गृहखात्यासाठी अडून बसलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते देण्यात आले आहे. दरम्यान, गृहशिवाय, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहेत.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर झालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांना खातेवाटप जाहीर झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्वात आधी 5 डिसेंबरला शपथ घेतली. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली होती.

कोणाला कोणते खाते पहा यादी –

कॅबिनेट मंत्री
1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
7.गणेश नाईक – वन
8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण
9.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर
16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे – महिला व बालविकास
21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
22.माणिकराव कोकाटे – कृषी
23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे – कापड
26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय
27.प्रताप सरनाईक – वाहतूक
28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
31.आकाश फुंडकर – कामगार
32.बाबासाहेब पाटील – सहकार
33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers )
34. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
35. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
36. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
37. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
38. योगेश कदम – गृहराज्य शहर

39. पंकज भोयर – गृहनिर्माण,

Previous Post

सरपंच हत्या प्रकरणी मुख्यमंत्री ॲक्शनमोडमध्ये; खंडणी प्रकरणात वाल्मिकी कराड यांच्यावर देखील मोठी कारवाई केली जाणार

Next Post

पंकजाताईना पर्णकुटी, धनंजय मुंडेना सातपुडा तर बावनकुळेना रामटेक….

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

पंकजाताईना पर्णकुटी, धनंजय मुंडेना सातपुडा तर बावनकुळेना रामटेक….

ताज्या बातम्या

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025
वेळेवर निर्णय न घेतल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांची पांगापांग.

वेळेवर निर्णय न घेतल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांची पांगापांग.

November 17, 2025
आता भाजपातही क्षीरसागर:फडणवीसांनी केले स्वागत.

आता भाजपातही क्षीरसागर:फडणवीसांनी केले स्वागत.

November 16, 2025
विधानसभेसाठीची भाजपची पहिली यादी जाहीर; ‘या’ नावांवर शिक्कामोर्तब

बीड शहरात प्रथमच भाजप ठरू पाहतोय तुल्यबळ पक्ष.

November 16, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.