• Contact Us
  • Home
Monday, August 4, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

वॉर्नर,पड्डीकल अनसोल्ड,भुवनेश्वरला मोठी किंमत…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 25, 2024
in क्रीडा विश्व
0

आययपीएल २०२५ साठी खेळाडूंच्या मेगा लिलावाचा आज (२५ नोव्हेंबर) दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी पंत, श्रेयस आणि व्यंकटेश यांच्यावर विक्रमी बोली लावण्यात आली, तर वॉर्नर आणि पडिक्कलसारख्या खेळाडूंना खरेदीदार मिळाले नाहीत.आज सोमवारी सर्व १० संघ उर्वरित १३२ जागांसाठी बोली लावतील.

अल्लाह गझनफर मुंबई इंडियन्समध्ये

अल्लाह गझनफर याला मुंबई इंडियन्सने ४.८०नकोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत ७५ लाख रुपये होती.

आकाशदीप लखनौच्या संघात

लखनौने आकाश दीपसाठी ८ कोटींची बोली लावली. आरसीबीने त्याच्यासाठी आरटीएमचा वापर केला नाही. आकाशची मूळ किंमत एक कोटी रुपये होती.

मुकेश कुमार दिल्ली संघात

पंजाब किंग्जने मुकेश कुमारसाठी ६.५०वकोटींची बोली लावली. दिल्लीने मुकेशसाठी आरटीएमचा वापर केला आणि पंजाबने मुकेशसाठी ८ कोटी रुपयांची अंतिम बोली प्रस्तावित केली, जी दिल्लीने स्वीकारली. अशाप्रकारे दिल्लीने मुकेशला RTM द्वारे ८ कोटी रुपयांना विकत घेतले. मुकेशची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.

दीपक चहर मुंबई इंडियन्समध्ये

दीपक चहरसाठी मुंबई इंडियन्सने ९.२५ कोटींची बोली लावली. चेन्नईने त्याच्यासाठी RTM वापरले नाही. चहरची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.

भुवनेश्वर कुमार आरसीबीमध्ये

भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. आरसीबीने भुवनेश्वरला १०.७५ कोटी रुपयांना खरेदी केले.

तुषार देशपांडे राजस्थान रॉयल्समध्ये

तुषार देशपांडे मूळ किंमत १ कोटी रुपये घेऊन मैदानात उतरला. त्याच्यासाठी राजस्थान आणि सीएसके यांच्यात स्पर्धा होती. अखेर राजस्थानने तुषारला ६.५० कोटींना खरेदी केले.

नितीश राणा राजस्थान रॉयल्समध्ये

नितीश राणाला राजस्थान रॉयल्सने ४.२० कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत १.५० कोटी रुपये होती.

क्रुणाल पंड्या आरसीबीमध्ये

कृणाल पांड्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. क्रुणालला आरसीबीने ५.७५ कोटी रुपयांना खरेदी केले.

मार्को यान्सेन पंजाब किंग्सकडे

मार्को यान्सेनची मूळ किंमत १.२५ कोटी रुपये होती. पंजाब किंग्जने त्याला ७ कोटी रुपयांना खरेदी केले. यान्सेनला घेण्यासाठी मुंबई आणि पंजाबमध्ये बराच काळ चुरस रंगली होती.

सॅम करन सीएसकेच्या संघात

सॅम करनला सीएसकेने घेतले. त्याची बेस प्राइस २ कोटी होती. त्याला सीएसकेने २.४० कोटीमध्ये खरेदी केले.

वॉशिंग्टन सुंदर गुजरात टायटन्सच्या संघात

वॉशिंग्टन सुंदरला गुजरात टायटन्सने ३.२० कोटी रुपयांना विकत घेतले. सुंदरची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.

मयंक अग्रवाल, शार्दुल, पृथ्वी शॉ अनसोल्ड

मयंक अग्रवालला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही ज्याची मूळ किंमत १ कोटी रुपये आहे.

पृथ्वी शॉमध्ये कोणत्याही संघाने स्वारस्य दाखवले नाही . त्याची मूळ किंमत ७५ लाख रुपये होती.

भारताचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर हा अनसोल्ड ठरला. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.

अजिंक्य रहाणे अनसोल्ड

भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे मूळ किंमत १.५० कोटी घेऊन मैदानात उतरला होता आणि कोणत्याही संघाने त्याला घेण्यास स्वारस्य दाखवले नाही.

डुप्लेसिस दिल्लीच्या संघात

दिल्ली कॅपिटल्सने फाफ डुप्लेसिससाठी २ कोटी रुपयांची बोली लावली. RCB कडे RTM पर्याय उपलब्ध होता, पण बेंगळुरूने त्याचा वापर केला नाही. डुप्लेसिस त्याच्या मूळ किमतीत दिल्लीत दाखल झाला.

रोव्हमन पॉवेल केकेआरच्या संघात

वेस्ट इंडिजचा झंझावाती फलंदाज रोव्हमन पॉवेलमध्ये फारशा संघांनी रस दाखवला नाही. कोलकाता नाईट रायडर्सने पॉवेलला त्याच्या मूळ किमतीत दीड कोटी रुपयांना खरेदी केले. पॉवेल आज विकला जाणारा पहिला खेळाडू होता.

केन विल्यमसन-ग्लेन फिलिप्स अनसोल्ड

न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यमसन याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. विल्यमसनची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे.

ग्लेन फिलिप्ससाठी कोणत्याही फ्रेंचायझीने बोली लावली नाही. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.

कोणत्या संघाकडे किती रक्कम?

पहिल्या दिवशी १० फ्रँचायझींनी मिळून ७२ खेळाडूंना खरेदी केले. यासाठी त्यांनी एकूण ४६७.९५ कोटी रुपये खर्च केले. आता संघांकडे एकूण १७३.५५ कोटी रुपये शिल्लक आहेत. आयपीएल मेगा ऑक्शन २०२५ च्या दुसऱ्या दिवशी १३२ खेळाडू लिलावाच्या मैदानात असतील.

आयपीएल ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सर्वाधिक रक्कम घेऊन लिलावाच्या टेबलावर बसेल. त्यांच्याकडे ३०.६५ कोटी रुपये शिल्लक आहेत. तर सध्या १६ खेळाडूंचे स्लॉट रिक्त आहेत, ज्यात ५ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

यानंतर मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये २६.१० कोटी रुपये शिल्लक आहेत तर पंजाब किंग्जने दुसऱ्या दिवसाठी २२.५० कोटी रुपये वाचवले आहेत. गुजरात टायटन्सकडे १७.५० कोटी रुपये शिल्लक आहेत तर राजस्थान रॉयल्स लिलावाच्या शेवटच्या दिवशी १७.३५ कोटी रुपयांसह लिलावाच्या टेबलवर बसतील.

चेन्नई सुपर किंग्जच्या पर्समध्ये १५.६० कोटी रुपये शिल्लक आहेत, तर लखनऊ सुपर जायंट्स दुसऱ्या दिवशी १४.८५ कोटी रुपयांसह प्रवेश करेल. दिल्ली कॅपिटल्स १३.८०वकोटी रुपयांसह लिलावात प्रवेश करेल तर कोलकाता नाइट रायडर्स सोमवारी १०.०५ कोटी रुपयांसह लिलावात प्रवेश करेल. सनरायझर्स हैदराबादकडे सर्वात कमी पर्स आहे जी दुसऱ्या दिवशी ५.१५ कोटी रुपये आणेल.

Previous Post

राजेश टोपे पडल्याचा आनंद आहे ; जरांगेंवर हकेंचे टीकास्त्र….

Next Post

तेरा वर्षाचा वैभव सूर्यवंशी झाला कोट्याधीश…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post

तेरा वर्षाचा वैभव सूर्यवंशी झाला कोट्याधीश…

ताज्या बातम्या

कामधेनू केअर सेंटर ही काळाची गरज-पाचपोर महाराज.

July 31, 2025

उद्योजक प्रकाश सुलाखे डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी स्मृती पुरस्काराने सन्मानित

July 28, 2025

पुन्हा भेटताही येत नाही…! विसरता ही येत नाही…!

July 12, 2025

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.