
नमस्कार..!
दि.१०|११|२०२४
*॥ कुष्मांड नवमी ॥*
🟣 कार्तिक शुद्ध नवमीला अनेक प्रकारच्या ब्रह्महत्याऽदी पापांचा नाश होण्यासाठी तसेच अनेक प्रकारच्या कामनापूर्ती साठी कूष्मांड (कोहळा) दान करावा.
या दिवशी संकल्प पूर्वक कूष्मांड दान केल्यास; त्या कूष्मांडामध्ये जितके बीज (बियां) असतील तितके सहस्र वर्ष पर्यंत “ब्रह्मलोक” प्राप्त होतो.
(भविष्य पुराण)
_____________________
🟣 या कूष्मांड दानाचा संकल्प सहित विधी पुढील प्रमाणे…
देशकालौ संकीर्त्य:-
*मम ब्रह्महत्याऽदि समस्त पापक्षय पूर्वकं पुत्र पौत्र सौभाग्याऽदि सकल मनोरथ अवाप्ति कूष्मांड बीज सम सहस्र संख्याब्द ब्रह्मलोक निवासकामःश्री परमेश्वर प्रीत्यर्थं ब्राह्मणाय यथाशक्ती उपस्करयुतं कूष्मांडदानं करिष्ये ।*
असा संकल्प करावा.
🟣 त्या नंतर; एका (ताट सदृश) पात्रात (तांदुळाच्या) साळीची राशी करावी; त्यात ऊस, चुक्राऽमलक (राय आवळा) ,(घृत) दीप, मोती, पोवळा,सुवर्ण इत्यादींसह बहूत बीज असलेला मोठा कोहळा ठेवावा.
या कोहळ्याची ;*॥ कूष्मांड देवताभ्यो नमः ॥* या मंत्राने कूष्मांडाची पूजा करावी.
🟣 या नंतर; गंध,अक्षता,पुष्प, तांबूल, दक्षिणा यांसह ब्राह्मणाची पूजा करावी.
नमोस्त्वनंताय○ या मंत्राने नमस्कार करावा.
पुढील मंत्रांने कूष्मांडाचे दान करावे.
🟣 दानमंत्र:-
१} *ब्रह्महत्याऽदि पापघ्नं ब्रह्मणा निर्मितंपुरा । कूष्मांडं बहुबीजाढ्यं पुत्र पौत्रादि वृद्धिदं ॥*
२} *मुक्ता प्रवाल हेमाऽदि युक्तं दत्तं तव द्विज । अनंत पुण्य फलदं अतः शांतिं प्रयच्छ मे ॥*
🟣 *इदं व्रीहि राशिस्थं बहुबीजाढ्यं कूष्मांडं इक्षुदंड चुक्राऽमलक दीप वस्त्र, गोधुमराशि आदि उपस्करयुतं वनस्पति दैवतं सुवर्ण दक्षिणायुतं (अमुक गोत्रोद्भवाय -अमुक शर्मणे सुपूजिताय) अधिकारिणे ब्राह्मणाय तुभ्यं अहं संप्रददे नमम !* इति द्विज हस्ते फलं दद्यात् ।
*प्रतिगृह्यतां* (असे दात्याने म्हणून;) *प्रतिगृण्हामि* (हे वचन दान घेणा-या गुरुजींनी म्हणावे.)
🟣 यस्यस्मृत्या ○ या मंत्राने “अच्युताचे” स्मरण करावे. *अनेन कूष्मांड दानेन श्रीपरमेश्वरः प्रीयतां नमम..!*
असे म्हणून कर्म परमेश्वराला अर्पण करावे.
(दानचंद्रिका & पूजासमुच्चय)
_____________________
🟣 या दिवशी “कृत युगाचा” आरंभ झाला.
करिता; पितृगणांच्या तृप्तीसाठी पिंडरहित असे श्राद्ध करावे.
(निर्णयसिंधू)
_____________________
🟣 या दिवशी मथुरेची किंवा अयोध्येची परिक्रमा ( प्रदक्षिणा) करावी.
(वाराहपुराण)
वे.शा.सं.अमोलशास्त्री जोशी,
श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
९५११८६९१५५
श्रीगुरुदेव दत्त..!