• Contact Us
  • Home
Saturday, February 7, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

संदिप क्षीरसागरांना मोठी जबाबदारी देणार-विराट जाहिरसभेत पवारांचा शब्द…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 9, 2024
in बीड जिल्हा, ऑनलाईन वृत्तसेवा
0

बीड- आगामी काळात राज्यस्त महाआघाडीचे सरकार येणार आहे या सरकारमध्ये संदीप क्षीरसागर यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवणार आहे. घरचे सोडून जात असताना मला संदीप क्षीरसागर सारख्या युवकांनी साथ दिली .तुम्ही या निवडणुकीत त्यांना विजयी करा मी त्यांना नक्कीच मोठी संधी देईल असे जाहीर आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड येथे आयोजित प्रचंड जाहीर सभेत बोलताना दिले.

छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर झालेल्या विराट सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांच्या स्मृतींना उजाळा देत काकूंनी समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचे काम केले, काकूंचा हाच वाचा त्यांच्या नातवाने म्हणजेच संदीप क्षीरसागर यांनी जपला असून तो ते पुढे नेतील असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

दोन वर्षांपूर्वी माझा पक्ष फोडण्यात आला तेव्हा सत्ता की तत्व ? असा प्रश्न समोर उभा असणाऱ्या संदीप क्षीरसागर यांनी सत्ता लाथाडत तत्वाला महत्व देत निष्ठेचा परिचय राज्याला दिला. आज ते माझ्यासोबत इथे पुन्हा उभे आहेत त्यांच्या विजयाची ग्वाही आपल्या प्रचंड उपस्थितीने मिळते आहे असे शरद पवार म्हणाले ,यावेळी उपस्थित लोकांनी त्यांना टाळ्याच्या प्रचंड कडकडातात प्रतिसाद दिला.

भरपूर कामे केली…
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ.संदीप क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, माझ्या विधानसभा सदस्यत्वाच्या काळात मी मोठमोठी कामे केली ज्यात नॅशनल हायवे, जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत,शासकीय विश्राम गृह आशा अनेक कामांचा समावेश आहे,तर काही कामे माझी जाणीवपूर्वक अडवण्यात आली पण तरीही आपण वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या कामांना मंजुरी आणली आणि ती पूर्णही केली. जेव्हा सत्ता की तत्व होता तेव्हा मी पवार साहेबांसाठी एकनिष्ठतेला महत्त्व दिले. संदीप क्षीरसागर यांना तिकीट मिळणार नाही अशा अफवा पसरवल्या गेल्या आज जमा झालेला विराट जनसमुदाय हा याची साक्ष आहे की मला तिकीट तर मिळणारच होते पण मी पुन्हा निवडून येईल याची ग्वाही बीड विधानसभा मतदारसंघाने या विराट उपस्थितीने दिली आहे.

Previous Post

पोलीस भरतीत प्राधान्य अन संघावर बंदी महाअघाडी पुढे ऑल इंडिया उलेमा बोर्डच्या अटी आणि शर्ती….

Next Post

आज कुष्मांड नवमी

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

आज कुष्मांड नवमी

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.