• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

संजय राऊत दुर्लक्षित: कोपऱ्यात बसावे लागले..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 6, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

मविआची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत बीकेसी येथे पहिली प्रचार सभा झाली, त्यावेळी संजय राऊत यांना व्यासपीठावर ‘पहिल्या फळीचे नेते’ असा सन्मान मिळत नव्हता. व्यासपीठावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादीचे शरद पवार, उबाठाचे उद्धव ठाकरे होते, सभेचे सूत्रसंचालन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले, पण संजय राऊत कुठेच दिसले नाही, त्यांना पहिल्या रांगेत सुनील प्रभू, नंतर वर्षा गायकवाड त्यानंतर दोन खुर्च्या सोडून कोपऱ्यात खुर्ची देण्यात आली होती, पोडियमच्या मागे राऊत झाकले जात होते.मविआतील काँग्रेस पक्षाने संजय राऊतांना झापल्यानंतर त्याचे हे परिणाम दिसले का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

प्रचारसभेत राहुल गांधी, खर्गे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भाषणे झाली पण यापैकी कुणीही खुद्द उद्धव ठाकरे यांनीही उपस्थितांची नावे घेताना संजय राऊतांचे नाव घेतले नाही. तसेच राऊत समोर दिसतील असेही व्यासपीठावर बसलेले नव्हते, संपूर्ण व्यासपीठावर संजय राऊतांचे अस्तित्वच दिसत नव्हते. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मविआमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु झाली तेव्हा उबाठाकडून संजय राऊत हे चर्चा करत होते. जागावाटपाच्या अनेक बैठकांमध्ये संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात खडाजंगी झाली. संजय राऊत यांनी शिवसेनेला शंभरापेक्षा जास्त जागा सोडा, अशी मागणी करत राहिले आणि काँग्रेस त्याला विरोध करत राहिले, हा वाद इतका टोकाला पोहचला की महाआघाडी फुटण्याची वेळ आली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस एकत्र येतील आणि उबाठा वेगळा होईल का, अशी चर्चा सुरु झाली. अखेरीस महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदी रमेश चेनिथल्ला हे चर्चेसाठी आले, त्यांनी नाना पटोले यांना चर्चेतून बाजूला करून बाळासाहेब थोरात यांना ठेवले, तर उबाठाने संजय राऊतांना बाजूला केले. आज प्रचार सुरु झाला आहे संजय राऊतांची सभा कुठेही दिसत नाही. मविआच्या सभेत नाना पटोले सूत्रसंचालक म्हणून दिसले, पण संजय राऊत कोपऱ्यात बसलेले दिसले, त्यामुळे मविआमध्ये राऊत पहिल्या फळीतून गायब झाले का, अशी चर्चा सुरु झाली.

Previous Post

अपक्ष उमेदवारांनी पचका करून ठेवलाय-जरांगे पाटील

Next Post

लोकसभेला मतदान नाही म्हणून गाव अंधारात…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

लोकसभेला मतदान नाही म्हणून गाव अंधारात…

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.