• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

ग्रामीण भागाचाही विकास करायचा आहे-डॉ. योगेश क्षीरसागर…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 6, 2024
in राजकारण, ऑनलाईन वृत्तसेवा
0

बीड – गेली अनेक वर्ष माझे वडील डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी बीडच्या नगराध्यक्षपदी काम केलेले आहे. त्यामुळे त्यांचा आणि माझाही जनसंपर्क हा बीड शहरात होता. पण आता आम्हाला ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनताही आमच्यासोबत आहे. ना.अजित यांच्या नेतृत्वाखाली बीड मतदारसंघाचा विकास होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष तथा महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईतून बुधवारी (दि.६) पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. तर बीडमधून पक्षाच्या संपर्क कार्यालयात प्रकाशन सोहळ्यासाठी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात प्रकाशन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, बीडचे महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ॲड.प्रज्ञा खोसरे, माजी नगरसेवक गणेश वाघामारे, बाबुराव दुधाळ, प्रेम चांदणे, रणजित बनसोडे, भास्कर जाधव, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.रमेश शिंदे, युवक तालुकाध्यक्ष नंदू कुटे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने अद्ययावत आरोग्य सुविधा, सर्वांनी शिक्षण, दर्जेदार आणि पायाभूत सुविधांचा , शेती व शेतकऱ्यांच्या विकास, सामाजिक विकास, असे सगळे वचन ना.अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाचननाम्यात दिली आहेत. त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. आपणही बीड शहरात, ग्रामीण भागात ज्या काही सुविधा उपलब्ध करून देऊ शकलो, त्या ना.अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत देऊ शकलेलो आहोत. यापुढेही बीड तालुका, शिरूर तालुक्याच्या भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात येतील आणि याचसाठी सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले आहे.

Previous Post

मराठा आरक्षण हा टेक्निकल विषय,लोकसभेत कायदा व्हावा..

Next Post

अपक्ष उमेदवारांनी पचका करून ठेवलाय-जरांगे पाटील

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

अपक्ष उमेदवारांनी पचका करून ठेवलाय-जरांगे पाटील

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.