• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

ट्रम्पतात्यांनी मारली बाजी;,भारतात स्वागत…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 6, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

सर्वात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत ट्रम्प यांनी बाजी मारली आहे, त्यांना 277 एलेक्टरल मते मिळाली असून कमला हॅरीस यांना 226 मते मिळाली आहेत .अमेरिकेत बहुमताचा आकडा २७० इतका आहे.ज्या पक्षाला २७० इलेक्टोरल मते मिळतात तो उमेदवार राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो. पण बहुमताचा आकडा गाठूनही राष्ट्राध्यक्ष होईलच याची खात्री देता येत नाही.

अमेरिकेच्या संविधानानुसार इलेक्टोरल मत देणारे हे त्यांच्या विरोधी पक्षाच्या उमेदवारालासुद्धा मत देऊ शकतात. असं केल्यास त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत असं घडलं आहे. कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. जर पक्षाच्या विरोधात इलेक्टोरल मते गेली तर बहुमत मिळूनही राष्ट्राध्यक्षपदापासून दूर रहावं लागेल. बहुमत कुणालाही मिळालं तरी शेवटी राष्ट्राध्यक्ष कोण होणार यावर सस्पेन्स कायम राहिल. इलेक्टोरल सदस्य जोपर्यंत मतदान करत नाहीत तोपर्यंत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाची धाकधूक कायम असते.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत इलेक्टोरल कॉलेजचा टप्पा सर्वात गुंतागुंतीचा असा आहे. सर्वसामान्य जनता राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्यांना मत देते ते इलेक्टोरल कॉलेज तयार करतात. इलेक्टोरल कॉलेज देशाच्या राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांची निवड करतात. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंगळवारी त्यांना मतदान होतं जे राष्ट्राध्यक्षांची निवड करतील. त्यांना इलेक्टर्स म्हणतात. हे इलेक्टर्स निवडून आल्यानंतर १७ डिसेंबरला आपआपल्या राज्यात एकत्र येऊन पुन्हा राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांसाठी मतदान करतात.

इलेक्टोरल कॉलेजमध्ये ५३८ इलेक्टर्स आहेत. ते सर्व ५० राज्ये आणि कोलंबिया जिल्ह्याचं प्रतिनिधीत्व करतात. प्रत्येक राज्यात ३ ते ५४ इतके इलेक्टर्स आहेत. इलेक्टोरल मतदारांची संख्या त्यांच्या अमेरिकन सिनेटर आणि प्रतिनिधींच्या संख्येच्या आधारे ठरवली जाते. ५३८ जागांच्या निवडणुकीत जो २७० किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकतो विजेता ठरतो. पण तोच राष्ट्रपती बनेल हे ठामपणे सांगता येत नाही. एखादा उमेदवार सर्वाधिक मते जिंकूनही इलेक्टोरल कॉलेजच्या मतदानात पराभूत होऊ शकतो. २०१६ मध्ये असं घडलं होतं. हिलरी क्लिंटन इलेक्टोरल कॉलेजमध्ये पराभूत झाल्या होत्या.

Previous Post

कोणाच्या माय का लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही…

Next Post

मराठा आरक्षण हा टेक्निकल विषय,लोकसभेत कायदा व्हावा..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

मराठा आरक्षण हा टेक्निकल विषय,लोकसभेत कायदा व्हावा..

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.