• Contact Us
  • Home
Saturday, June 7, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

अनिल जगताप यांच्या अपक्ष उमेदवारीने बीडमध्ये रंगत वाढली..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 6, 2024
in राजकारण, बीड जिल्हा
0

 
  बीड विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाचे वारे वेगाने वाहत आहे. अपक्ष उमेदवार म्हणून अनिल जगताप यांनी उमेदवारी कायम ठेवली असून त्यांना शिलाई मशीन हे चिन्हही मिळाले आहे,त्यात त्यांना मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांचेही अप्रत्यक्ष सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण 10 आरक्षण समर्थक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत,या पार्श्वभूमीवर त्यांचे या निवडणुकीत पारडे जड झाले आहे.

बीड मतदार संघात यंदाचा आमदार म्हणून अनिल जगताप यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. अनिल जगताप यांना आमदार करण्यासाठी बीडमधील तळागाळातील माणसं मोठ्या ताकदीने उभी राहीली आहेत. जे आहे ते आणि जसं आहे तसं समोर वागणाऱ्या अनिल जगताप यांना यंदा विजयाचा गुलाल लागणार असे वातावरण निर्माण झाले आहे.

बीड जिल्ह्यातील नेत्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःच्या व्यक्तिमत्वाची समाजावर छाप सोडली आहे. म्हणूनच बीडच्या राजकारणाची गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत नेहमीच चवीने चर्चा केली जाते. बीड जिल्ह्याच्या मातीत आजवर अनेक रत्न जन्माला आलेली आहेत. शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात बीडच्या माणसांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमठवत राज्यातच नव्हे तर देशभरात बीडचे नाव गाजावले आहे. य
बीडच्या राजकीय परिघात वावरणारी कर्तुत्ववान माणसं नेहमीच चर्चेचा भाग राहिलेली आहेत. यापैकीच एक म्हणजे अनिल जगताप होय.

    भली मोठी उंची, दणकट बांधा, चेहऱ्यावर आकर्षक दाढी, धारदार नजर, गळ्यात भगवा गमचा आणि मर्दानी चाल, स्वभावात नम्रता, आपुलकी आणि गोडी, माणुसकीने नम्र व्यक्तिमत्व असं काहीसं वर्णन केलं की, अनिल जगताप यांची छबी डोळ्यासमोर उभी राहते.   कुटुंबाचा कुठलाही राजकीय वारसा नसताना अखंडित समाजसेवा करणारा राजकारणी म्हंटलं की, बीडवासियांच्या तोंडात अनिल जगताप हे नाव नकळत येऊन जातं. गेल्या चाळीस वर्षांपासून अनिल जगताप यांची प्रामाणिकता बीडकरांनी पाहिलेली आहे म्हणूनच अनिल जगताप यांचा झंजावात विधान भवनाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचत आहे, अशी जनमानसात भावना आहे.

Previous Post

विस्थापित-निष्ठावंतासाठी ‘अव्हेलेबल बेस्ट ‘ उमेदवार…

Next Post

कोणाच्या माय का लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post

कोणाच्या माय का लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही...

ताज्या बातम्या

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

सोयाबीन, तूर, मुगाची आधारभूत किंमत वाढवली…

May 28, 2025

आला रे आला ,मान्सून आला..

May 25, 2025

भारतीय संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल.

May 24, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.