• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

आज बलीप्रतिपदा….

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 2, 2024
in सांस्कृतिक
0

नमस्कार…!

दि.०२/११/२०२४

   *॥ बलिप्रतिपदा ॥*

🟣 या दिवशी प्रातःकाळी अभ्यंग स्नान करावे.
(धर्मसिंधू)

🟣 या दिवशी रात्री घरात पाटावरती तांदूळाची बलिराजाची प्रतिमा काढावी.

श्री विष्णु देवतेचे सानिध्य प्राप्त होण्यासाठी पुढीलप्रमाणे संकल्प करून;बलिराजाची यथाविधी पूजा करावी.
(भविष्य पुराण-हेमाद्री)

🟣 संकल्प:- *मम श्रीविष्णुसानिध्यर्थं बलि पूजां करिष्ये  ।*

असा संकल्प करून; पुढील मंत्राने पूजा करावी.

🟣 पूजेचा मंत्र  :-
*बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभो ।*
*भविष्येंद्र सुराराते पूजेयं प्रतिगृह्यतां ॥*

पूजेनंतर खालील मंत्राने  प्रार्थना करावी..

🟣 प्रार्थना मंत्र:- *बलिराज नमस्तुभ्यं दैत्यदानव वंदित  ।*
*इंद्रशत्रो अमराराते विष्णुसांनिध्यदो भव ॥*
(पूजासमुच्चय)

🟣 बलिराजाच्या नावाने “सद्विप्रास” दाने द्यावीत.

बलीच्या उद्देशाने जी दाने दिली जातात ती अक्षय्य विष्णुची तृप्ती करणारे होतात. 
(पद्मपुराण)

🟣 या प्रतिपदेला जर व्यक्ती दैन्यपणाने राहील तर वर्षभर दैन्य प्राप्त होईल. आणि जर हर्षाने (आनंदाने) राहील तर वर्षभर आनंद प्राप्त होतो.
(धर्मसिंधू)

🟣 या दिवशी प्रातःकाळी मनुष्यांनी द्यूत खेळावे.
यात जय प्राप्त झाल्यास वर्षपर्यंत जय प्राप्त होतो.
पराजय झाला असता तो “लाभाचा” नाश करतो.

ही रात्र स्वस्त्री – परिवार सहित मोठ्या आनंदाने घालवावी.
(ब्रह्मपुराण -हेमाद्री)

🟣या दिवशी प्रदोषकाळी दिवे लावल्यास; लक्ष्मी सार्वकाल स्थिर रहाते.

दिवे लाऊन ओवाळावे. असा विधी असलेने या प्रतिपदेला “दीपावली” म्हणतात.

卐 हे केशवा; या बलिराज्याचे दिवशी ज्यांनी दीपांची पड़्ति लावली नाही;त्यांचे घरी *”दिवे”* कसे लागणार ???
(धर्मसिंधू)

🟣 या दिवशी ; विपुल गो-धन प्राप्ती तसेच क्षेमाऽयु, पुष्टिसाठी ;  प्रातःकाळी गोमयाचा गोवर्धन पर्वत करून; त्याची संकल्प पूर्वक; पूजा करावी.

🟣 संकल्प :- *मम श्रीकृष्ण प्रीतिद्वारा सकल पापक्षय पूर्वकं कोटिशः धेनु प्राप्ति पुष्ट्यायुः क्षेमादि सिद्ध्यर्थं गोवर्धन सहित श्रीगोपाल पूजनं गोवृंद पूजनं च करिष्ये ।*

असा संकल्प करून गणेशपूजा- कलशपूजा करावी. 

🟣 *बलिराज्ञो द्वारपालो भवान् अद्य भवत् प्रभो। निजवाक्य अर्थनार्थाय स गोवर्धन गोपते ॥*

या मंत्राने गोवर्धन आणि गोपालांचे आवाहन करावे.
अनेक प्रकारच्या नैवेद्य आदींसह षोळशोऽपचार पूजा करावी.

🟣 *गोपालमूर्ते विश्वेश शक्रोऽत्सव विभेदक । गोवर्धन कृतच्छत्र पूजां मे हर गोपते ॥*

*गोवर्धनधर आधार गोकुलत्राण कारक। विष्णुबाहु कृतच्छाय गवां कोटिप्रदो भव ॥*

या दोन मंत्रांनी गोपाळकृष्णांची प्रार्थना करावी.

या सोबतच “गोवत्सांची” देखील  पंचोऽपचार पूजा करावी.

🟣 *लक्ष्मीर्या लोकपालानां धेनुरूपेण संस्थिता । घृतं वहति यज्ञार्थे  मम पापं व्यपोहतु  ॥*

या आणि अशाप्रकारच्या अनेक मंत्रांनी गायीची स्तुती  आणि पूजा करावी.

🟣 गायींच्या सुखासाठी यज्ञ करावा.
(आपल्याकडे यज्ञाचे विधान उपलब्ध आहे.)

🟣 विप्रांना, सुहृदांना; विशेष अन्नांनी भोजन द्यावे.

🟣 विप्रांना-गाय,   दीनांना-भोजन, गायींना-यव सम अन्न , गिरीला- बलि; द्यावे.

🟣 गायींना शरदऋतूतील पुष्पांनी अलंकृत करावे.
स्वतः “एकभुक्त” राहून; अलंकार धारण करून; परिवार सहित; ब्राह्मण, गाय, होम, गोवर्धन पर्वत यांच्या प्रदक्षिणा कराव्यात.

🟣 या दिवशी गायीची धार काढणें, बैलांकरवी भारवाहणें इत्यादी करूं नये.
(स्कंदपुराण- हेमाद्री/निर्णयांमृत)

🟣 *मार्गपाली बंधन :-*
या दिवशी कुशांची व काशतृणांची (बहुत लुंबकांनी युक्त) सुंदरअशी *मार्गपाली* रज्जू ( म्हणजे दोरी) तयार करावी.

🟣 ती दोरी उंच अशा खांबाला आणि मोठ्या वृक्षाला बांधावी.

या दोरीला पुढील मंत्राने ( अभिमंत्रित करून) नमस्कार करावा.

🟣 मंत्र :-
*मार्गपाली नमस्तेस्तु सर्व लोक सुखप्रदे । विधेयैः पुत्रदाराद्यैः पुनरेहि व्रतस्य मे ।*
अशाप्रकारे नमस्कार आदी करून झाल्यावर; सायंकाळी त्या दोरीच्या खालून गायी, घोडे , पाळीवप्राणी, स्त्रियां पुत्रांसह गावातील सर्व लोकांनी त्या *”मार्गपाली”* च्या खालून जावे.

*अशाप्रकारे “मार्गपाली” चे उल्लंघन केल्यास;*
(उल्लंघन करणारें) *सर्व जण सुखी आणि निरोगी होतात.*
(स्कंदपुराण)

🟣 या दिवशी नारीकतृक नीरांजन विधी करावा.

नूतन वस्त्र धारण करावे.   वहीपूजन आदी करावे .
(धर्मसिंधू)

🟣 *उपरोक्त “अभ्यंग स्नाना” शिवाय सांगितलेली सर्व कर्मे   स्वकुळातील आचार परंपरेनुसार करावी.*

*॥ शुभदीपावली ॥*

वे.शा.सं.अमोलशास्त्री जोशी,

श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.

९५११८६९१५५

श्रीगुरुदेव दत्त…!

Previous Post

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताला बीडमधून लाईट गायब

Next Post

तर त्यांची भूमिका निःपक्षपाती की राजकीय हे स्पष्ट होईल…..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

तर त्यांची भूमिका निःपक्षपाती की राजकीय हे स्पष्ट होईल…..

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.