
बीड–
प्रतिवर्षाप्रमाणे रसिक फाउंडेशनच्या वतीने पाडव्याच्या पहाटे बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पंडित कुमार मर्दुर यांचे गायन फक्त सभासदांसाठीआयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम इझी-गो हॉलिडेज च्या वतीने प्रायोजित करण्यात आला आहे .यावेळी रसिक फाउंडेशनच्या सभासदांसाठी एक लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे, यातून दोन जोडप्यांना थायलंड आणि गोवा ट्रिप मोफत देण्यात येणार आहे.
गेल्या सात वर्षापासून बलिप्रतिपदा अर्थात पाडव्याचा पहाटे बहारदार संगीताच्या मैफिलीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी धारवाड येथील पंडित कुमार कुमार मर्दुर यांच्या गायनाचे आयोजन करण्यात आले असून त्यांना हार्मोनियमवर शशिकांत देशमुख ,तबल्यावर अविनाश मुळे पाटील तर पखवाजवर बंकट बैरागी हे साथसंगत करणार आहेत.
जे रसिक अजून रसिक फाउंडेशनचे सभासद झाले नाहीत त्यांनी त्वरित सभासद शुल्क भरून या मैफिलीचा आणि लकी ड्रॉ चा लाभ घ्यावा असे आवाहन रसिक फाउंडेशनच्या
वतीने रसिक फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.अनुराग
पांगरीकर,संस्थापक अध्यक्ष अमर डागा,उपाध्यक्ष महेश वाघमारे, सचिव मिलिंद सुंदर,कोषाध्यक्ष विकास उमापूरकर,प्रदीप मुळे डॉ प्रसन्न कुलकर्णी,वाय जनार्दन राव,डॉ.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर,विष्णूदास बियाणी ,सुदर्शन धुतेकर,
सी ए गोपाल मालू ,दीपक कर्णावट,राम मोटवानी, ईश्वर मुथा,सुदर्शन धुतेकर, डॉ.अनिल बारकुल,सौ.विनया हसेगावकर,सौ.प्रज्ञा बडवे यांनी केले आहे.