• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

महायुतीचे जागावाटप पूर्ण,विवादित जागांचा निर्णय स्थानिक पातळीवर..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 25, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

महायुतीमध्ये २७७ जागा एकमताने ठरल्या असून उर्वरित जागांवर दोन दिवसांत निर्णय होऊन जागावाटपाच्या चर्चा बंद होतील, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

म्हणाले, भाजपाची दुसरी व तिसरी यादी केंद्रीय संसदीय बोर्ड जाहीर करणार आहे. भाजपाच्या इच्छुकांनी उमेदवारी जाहीर झाल्याशिवाय केंद्रीय संसद मंडळाच्या विरुद्ध जाऊन नामांकन अर्ज दाखल करू नये असे भाजपा कार्यकर्त्यांना बजावले आहे.

आर्णी विधानसभा मतदासंघातील माजी आमदार राजू तोडसाम, मूर्तीजापूर विधानसभा क्षेत्रातील नेते रवी राठी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. त्यांचे पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. अमरावती जिल्हा उपाध्यक्ष तसेच मोर्शी विधानसभेचे भाजपा नेते उमेश यावलकर यांनी दिलेला राजीनामा परत घेतल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. पक्षप्रवेशाने भाजपा संघटन मजबूत होणार असून येत्या काळात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतील असा विश्वास व्यक्त केला.

मोदींच्या सभाही ठरल्या.

महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात ११ते १३ ठिकाणी सभा होणार असून मुंबई,गोंदिया, अकोला, नांदेड, धुळे, नवी मुंबई यासह अन्य शहरे ठरत आहेत.

बावनकुळे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नागपुरात कोणतीही जागा मागितली नाही.चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपाच्या संपर्कात आहेत. जिल्हाचे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार हे त्यांच्याशी समन्वय साधून योग्य निर्णय होईल व चर्चेतून निर्णय होईल. नागपूर शहरात प्रत्येक जागेसाठी 5 ते 8 नावे पार्टीकडे आली आहेत. निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड करेल.
नवाब मलिक यांच्याबाबत निर्णय अजित पवार घेतील. त्यांना सांगण्यात आले आहे. आमची चर्चा झाली. आमदार रवी राणा हे त्यांच्याच युवा स्वाभिमान पक्षात राहतील अशी माहिती बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Previous Post

जरांगे पाटलांकडे मुंबईतूनही इच्छुकांची गर्दी…

Next Post

भाजपाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निष्ठावंत शंकर देशमुख…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

भाजपाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निष्ठावंत शंकर देशमुख…

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.