बीड –
वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे दिला आहे.
राजीनामा पत्रात ते म्हणतात पक्षात कार्यरत असताना जो मान सन्मान, संधी दिली त्याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांचे मनःपूर्वक आभार मानतो.तसेच आपण व मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जे प्रेम व सहकार्य दिले त्यातुन मी उतराई होवु शकत नाही.
शेकडो मराठा तरुणांच्या आत्मबलीदानानंतर, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधुन प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहेत. लोकसभेनंतर झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बैठकीत वितरीत करण्यात आलेली सर्व कुणबी प्रमाणपत्र बोगस आसुन ती रद्द करण्यात यावीत अशी असैविधानीक मागणी शासनाकडे करण्याचा राज्य कार्यकारिणीने निर्णय घेतल्याने मला सामाजिक दृष्ट्या पक्षात काम करणे अडचणीचे ठरत आसल्याने मी आज मराठवाडा अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.पक्षात कार्यरत असताना माझ्याकडुन कळत नकळत काही चुका झाल्या आसतील कुणाचे मन दुखावले आसेल तर त्यासाठी क्षमस्व..