• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

दोन जिल्ह्यात भूकंप;नागरिक भयभीत

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 22, 2024
in ताज्या बातम्या
0

नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांना मंगळवारी (२२ ऑक्टोबर २०२४) सकाळी ०६:५२ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यासंदर्भात जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रानेही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केलवर ३.८ एवढी नोंदवण्यात आली आहे.
महत्वाचे म्हणजे, भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड शहरापासून २९ किमी दूर उत्तरपूर्व दिशेला हदगाव तालुक्यातील सावरगाव येते होता.

या धक्क्यामुळे कुठलीही जीवित वा वित्त हानी नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राला प्राप्त झाली असल्याचे नांदेडमधील जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाने म्हटले आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव या तालुक्यांनाही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती आहे. हिंगोली जिल्ह्यात गेल्या सहा वर्षापासून भुकंपाचे धक्के जाणवत आहेत. यापूर्वीही ४.५ रिश्टर स्केलचा धक्का जाणवला होता. गेल्या सहा ते सात वर्षापासुन सतत वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ तालुक्यास सतत भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्यामुळे नागरीकांत भीती व्यक्त केली जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत तालुक्यातील दांडेगाव, पांगरा शिंदे, वारंगा, कुरूंदा, कवठा, पिंप्राळा ,डोणवाडा व इतर अनेक भागांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला आहे.

Previous Post

लॉरेन्स बिश्नोई कॅनडा पोलिसांच्याही रडारवर

Next Post

नऊ दिवसात 5 हजार किलोमीटर अन तेही…….

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

नऊ दिवसात 5 हजार किलोमीटर अन तेही.......

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.