• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

अज्ञाताच्या गोळीबारात बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 13, 2024
in ताज्या बातम्या
0
अज्ञाताच्या गोळीबारात बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू

Oplus_131072

Oplus_131072

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर अज्ञात तरुणांनी गोळीबार केला असून ते गोळीबारात मृत झाल्याचे सांगितले गेले आहे.

वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर परिसरात ही घटना घडली. तीन ते चार तरुणांकडून गोळीबार केला असल्याची माहिती मिळते आहे.लिलावती रुग्णालयात त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे साम सुत्रांनी सांगितलं आहे.

शनिवारी रात्री ९ वाजता तीन ते चार तरुणांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला आहे. दोन ते तीन राऊंड त्यांच्यावर झाडण्यात आले, यातील एक गोळी त्यांच्या छातीत लागल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वीच त्यांना जीवेमारण्याची धमकी आली होती. एसआरए प्रकल्पातील वादातून ही धमकी देण्यात आल्याची माहिती मिळते आहे.बाबा सिद्दीकी निर्मल नगर इथं एका जाहीर कार्यक्रमासाठी गेले होते. त्यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी झाली, त्याआडून हा गोळीबार झाला आहे. त्यांना तीन गोळ्या लागल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळच हा गोळीबाराचा प्रकार घडला आहे. दरम्यान, पोलीस याप्रकरणी सीसीटीव्ही तपासण्याचं काम करत आहेत. बाबा सिद्दीकी हे काँग्रेसमध्ये होते, त्यांनी नुकताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Previous Post

लोक मरत होते अन तुम्ही पैसे मोजत होते……

Next Post

जेवताना ताटात हात घातल्याच्या कारणावरुन तरुणाचा खून; पुण्यातील घटनेने खळबळ

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
जेवताना ताटात हात घातल्याच्या कारणावरुन तरुणाचा खून; पुण्यातील घटनेने खळबळ

जेवताना ताटात हात घातल्याच्या कारणावरुन तरुणाचा खून; पुण्यातील घटनेने खळबळ

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.