पीएफमध्ये ( PPF) च्या काही योजनेमध्ये अर्थ मंत्रालयाकडून बदल करण्यात आले आहेत. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने कालपासून 1 ऑक्टोबर 2024 पासून लहान बचत योजनेमध्ये मोठा बदल केला आहे.
नवीन नियम मुख्यत: अल्पवयीन खातेधारक, एकाधिक खाती असलेले खातेदार आणि अनिवासी भारतीयांना लागू होणार आहेत. या निर्णयामुळे फायदा होणार की नुकसान हे जाणून घेऊया
मुलांच्या खात्यासंबंधी नवा नियम
मुलांच्या नावाने असलेल्या PPF खात्यांबाबत नवीन नियमानुसार बदल झाले आहेत, त्यानुसार जर तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने पीपीएफ खाते सुरु केले असेल, तर तुमचे पाल्य 18 वर्षांचे होईपर्यंत त्या खात्यावर पोस्ट ऑफिस बचत खात्यानुसारच व्याज दिले जाणार आहे. 18 वर्ष झाल्यानंतर त्या खात्यावर पीपीएफनुसार व्याज दिले जाणार आहे. काही लोकांनी स्वत:च्या आणि मुलांच्या नावाने स्वतंत्र पीपीएफ खाती सुरु केल्याचे सरकारच्या निर्देशनास आले त्यामुळे हा बदल अर्थ मंत्रालयाने केला आहे. या खात्याची परिपक्वता ( Maturity) कालावधी ही मूल ज्या दिवसापासून 18 वर्षाचा होईल त्या दिवसापासून सुरू होईल. त्यामुळे मुलांना मोठे झाल्यानंतर पैशाचे व्यवस्थापन करणे अधिक सोपे होणार आहे.
निर्णयामुळे आता तुम्हाला मुलांच्या पीपीएफ खात्यावर पूर्वीप्रमाणे व्याज मिळणार नाही. या खात्यांवर आता बचत खात्यांप्रमाणे व्याज मिळणार आहे.
प्राथमिक अथवा दुय्यम खातेदारांसाठी नियम
काही लोकांनी एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते आहेत. म्हणजे हे लोक अनेक खात्यांमध्ये दरवर्षी 1.5 लाख गुंतवतात. जारी केलेल्या नवीन नियमात स्पष्ट करण्यात आले आहे की, जोपर्यंत वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीच्या मर्यादेत असेल तोपर्यंत तुम्हाला एकाधिक खात्यांवर व्याज मिळेल. जर प्राथमिक खात्यांची एकूण शिल्लक रक्कम ही 1.5 लाख रुपयांच्या खाली असेल तर त्यांच्या दुय्यम खात्यातील रक्कम प्राथमिक खात्यामध्ये विलीन केली जाईल. मात्र दुय्यम खात्यातील जास्त शिल्लक रक्कम ही कोणत्याही व्याजाशिवाय परत केली जाणार आहे.आता या नियमानुसार प्राथमिक आणि दुय्यम खात्यांव्यतिरिक्त कोणत्याही खात्यावर व्याज दिले जाणार नाही.
काही लोक एकापेक्षा अधिक पीपीएफ खात्यांमध्ये 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करत असत. ज्यामुळे त्यांना प्रत्येक खात्यांच्या रक्कमेवर 7.1 टक्क्याने व्याज मिळत असे आता मात्र सरकारच्या नियमामुळे हे शक्य होणार नाही.
अनिवासी भारतीयांसाठीच्या PPF नियमात बदल
अनिवासी भारतीय (NRI) आहेत आणि ज्यांच्याकडे PPF खाती आहेत. जे अजूनही भारतात येतात त्यांना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत व्याज मिळेल. यानंतर त्यांना नवीन नियमांनुसार फॉर्म एच मध्ये दिलेल्या निकषांचे पालन करावे लागणार आहे.