

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज (रविवार, 12 एप्रिल) निधन झालं. दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 92 वर्षांच्या होत्या. शनिवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आशा भोसले यांच्या निधनाचं कारण सांगितलं. सर्व अवयव निकामी झाल्याने (मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे) त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. आशा भोसले यांच्या पार्थिवावर उद्या (सोमवार) दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल, अशी माहिती आनंद भोसले यांनी दिली. तर सकाळी 11 ते 2 दरम्यान लोअर परळ इथल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेता येईल.
गिनीज रेकॉर्ड आशाताईच्या नावावर।।

“रेशमाच्या रेघांनी”, “हसले मनी चांदणे” , ‘चुरा लिया है’, ‘दम मारो दम’, ‘आओ हुजूर तुमको’ अशी असंख्य गाणी आशा भोसले यांनी गायली आहेत. त्यांच्या नावावर जगातील सर्वात मोठा जगातील सर्वात मोठा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देखील आहे.लोकप्रिय गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत संगीताची सेवा करणाऱ्या आशा ताईंनी तब्बल 12 हजार पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. त्यांच्या नावावर अनेक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देखील आहेत. वयाच्या 10 व्या वर्षी त्यांनी संगीत विश्वात पदार्पण केलं आणि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांनी मराठी सिनेमांमध्ये सुरुवातीला गाणी गाण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.. कोणाला ठाऊक होतं की एका लहान मुलीची ही साधी सुरुवात भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक बनेल? त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की प्रतिभा आणि कठोर परिश्रमाने काहीही साध्य करता येतं.
फार कोणाला माहिती नसेल, जगात सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केल्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आशाताईंच्या नावावर आहे. त्यांनी 20 हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. हिंदी, मराठी किंवा इतर कोणतीही भाषा असो, त्यांचा आवाज सर्वत्र जादू निर्माण करणारा ठरला. हा आकडा केवळ एक संख्या नसून, त्यांच्या सात दशकांच्या कठोर सरावाचा आणि संगीताप्रती असलेल्या अढळ समर्पणाचा एक जिवंत पुरावा आहे.


