• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 4, 2026
in ताज्या बातम्या
0


बीड – राष्ट्रसेविका समिती स्थापनेला ९० वर्षे पूर्ण होत असताना, घोषवादन -नवति स्वरशक्ती चा भव्य जागर बीड येथे होत आहे. राष्ट्रसेविका समिती विविध कार्यक्रमातून समाजात सेवा, समर्पण, राष्ट्रभक्तीचा भाव निर्माण करते.
घोषवादन हे केवळ संगीत नसून आपल्यात एकाग्रता ,अनुशासन निर्माण करणारी एक साधन आहे .राष्ट्रसेविका समितीच्या शाखेतून स्त्री शक्तीचे संघटन हा मंत्र जपत, व्यायामयोग, खेळ, गीत असे शारीरिक आणि बौद्धिक कार्यक्रम होत असतात. घोष हा शारीरिक विभागाचे अभिन्न अंग आहे . सैन्यदलात बँडवर पश्चिमात्य शैलित वादन होत असे, त्याला भारतीय रचनेत बसून संघ आणि समितीत घोषवादन सुरू झालेले आहे .
आपल्या परंपरेत भगवान श्रीकृष्णाने “पांचजन्य” आणि अर्जुनाने” देवदत्त’ घोषणाद युद्धप्रसंगी केलेला आहेच ,सैन्याचे मनोबल वाढवणे, प्रतिस्पर्ध्याचे खच्चीकरण करण्यासाठी हा घोषणाद महत्त्वपूर्ण ठरतो .शूरवीरांच्या माथ्यावर टिळा, त्याप्रमाणे युद्धात “घोषणाद”.
निवृत्त सेनाअधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक,सेविकांनी भारतीय रचना घेऊन घोषवादन सुरू केले, यात अनक, पणव ,त्रिभुज, शंख, झल्लरी,तूर्य ,गोमुख ,स्वरदा,नागांग ही वाद्य महत्त्वाची ,यासाठी प्रशिक्षणवर्ग ,घोष शिबिरे घेऊन आज हजारो स्वयंसेवक, समितीच्या सेविका घोषवादन करतात.
” कदम से कदम, और मन से मन जोडकर संघटन बढाने हेतू” हे घोषवादन महत्वपूर्ण कार्य करते .एक एक पावला जुळताना पावलाचे रे मन जुळताना संघाचा विश्वास आहे की पावलं जुळले की मन जुळतात म्हणून पाऊल जुळवण्यासाठी शूर वीर रसातील घोषवादन करून वीर रसाचा संचार करतात,यातून मनमनामधील लहान थोर भावना विलुप्त होऊन आम्ही सर्व एका दिशेने चालणारे समान आहोत ही भावना वाढीस लागते.
भारतीय रचना आता नौसेनादलात आणि मोठ्या समारंभातून देखील वाजवल्या जात आहेत .सहयोग ,संस्कार आणि समता याची रुजवण या घोषनादातुन होते .ओंकार या महानादातून सृष्टी निर्माण झाली, नादस्वर, ध्वनी परमेश्वराकडे घेऊन जात चित्त स्थिर करतो, असे घोषवादन ‘स्वर शक्ती चा जागर” बीडमध्ये होणे ही एक पर्वणीच आहे ,हे स्वर आणि त्याचे महत्व कानी पडावे यासाठी उपस्थित राहणे हे भाग्यवंताचे ठरणारे आहे.
९० पेक्षा जास्त सेविका, गणवेशात हे घोषवादन ,मातृभूमी वंदन करणार आहेत. यावेळी पुणे येथील सौ धनश्री केदार- फाटक आणि राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. प्रज्ञा भरतबुवा रामदासी यांची ही प्रमुख उपस्थिती आहे ,तर यायलाच पाहिजे…. रविवारी बरोबर दुपारी चार वाजता ,सिद्धिविनायक संकुलात.

Previous Post

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

Next Post

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.