• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
December 20, 2025
in ताज्या बातम्या
0

मुंबई – आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. गतविजेता भारतीय संघ ही स्पर्धा होस्ट करणार आहे. या स्पर्धेला येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

तर स्पर्धेतील अंतिम सामना ८ मार्चला खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान मिळवला होता. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ तिसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान शनिवारी (२० डिसेंबर) बीसीसीआयने या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघातून शुबमन गिलची सुट्टी करण्यात आली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला आहे. यासह दुखापत हे देखील प्रमुख कारण आहे. त्यामुळे संजू सॅमसन टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघासाठी डावाची सुरूवात करताना दिसू शकतो. यासह रिंकू सिंगला पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे. मुख्य बाब म्हणजे, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणाऱ्या इशान किशनला देखील या संघात दुसरा यष्टीरक्षक म्हणून संधी दिली गेली आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी संघाचा भाग असलेल्या जितेश शर्माला संघाबाहेर करण्यात आलं आहे.

असा असेल भारतीय संघ

सूर्य कुमार यादव (कर्णधार )
जसप्रीत बुमराह
अभिषेक शर्मा
हर्षित राणा
संजू सॅमसन (विकेटकिपर)
अर्शदीप सिंह
तिलक वर्मा
कुलदीप यादव
हार्दिक पंड्या
वरुण चक्रवर्ती
शिवम दुबे
वॉशिंग्टन सुंदर
अक्षर पटेल (उपकर्णधार)
इशान किशन (विकेटकिपर)
रिंकू सिंग

या स्पर्धेतील भारतीय संघाच्या सामन्यांचं वेळापत्रक

७ फेब्रुवारी – भारत विरुद्ध अमेरिका, मुंबई

१२ फेब्रुवारी – भारत विरुद्ध नामिबिया, दिल्ली

१५ फेब्रुवारी, भारत विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो

१८ फेब्रुवारी, भारत विरुद्ध नेदरलँड, अहमदाबाद.

Previous Post

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

Next Post

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

घोषवादन - नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.