• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 26, 2025
in ताज्या बातम्या
0
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.


बीड (प्रतिनिधी ) युट्यूब चॅनेल, ऑनलाईन वृत्तपत्र, संकेतस्थळ, सोशल मिडिया हॅन्डलच्या कुठल्याही प्रतिनिधीला किंवा कॅमेरामनला प्रवेशिका देण्यात येणार नाही असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी जाहीर केले आहे. फेसबुकवरील आपल्या पेजवर संबंधित यंत्रणेने हे जाहीर केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हंटले आहे की,नगरपालिका निवडणूक 2025 कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील बीड, गेवराई, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, माजलगाव आणि किल्‍ले-धारूर या 6 नगरपालिकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान आणि 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. याचे वृत्‍तसंकलन करण्यासाठी माध्यम प्रतिनिधींनी या नगरपालिकांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्‍यांकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
माध्यम प्रतिनिधींनी आपल्या संपादकांच्या शिफारस पत्रासह 3 छायाचित्रे तसेच आधार क्रमांकाच्या पुराव्यासह संबंधित कार्यालयांकडे अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा माध्यम संनियंत्रण व माध्यम प्रमाणन (MCMC) समितीने केले आहे.याबाबत निवडणूक मार्गदर्शक तरतुदीत असलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांनी हे आदेश जारी केले आहेत. यानुसार बीड सह उर्वरित 5 नगरपरिषदांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रवेशिका जारी करणारे प्राधिकारी घोषित करण्यात आले आहे.
माध्यम प्रतिनिधींना सूचना
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने प्रसार माध्यमातील प्रतिनिधींना मतदान केंद्र तसेच मतमोजणी केंद्रात प्रवेशिकेशिवाय प्रवेश करता येणार नाही.
विहित पद्धतीनुसार माध्यम प्रतिनिधींना संपादकांच्या शिफारस पत्रासह ताज्या 3 छायाचित्रांसह आणि ओळख पटवण्यासाठी आधार ची झेरॉक्स किंवा वृत्तपत्राने दिलेले ओळखपत्र यांची झेरॉक्स अर्जासह जोडावी.
राज्य शासनाच्या यादीवरील वृत्तपत्रांसाठी दैनिकाचे संपादक व प्रतिनिधी (अधिकाधिक 2 जणांना) प्रवेशिका दिला जातील.
उपग्रह वाहिन्या तसेच टपाल खात्याचा परवाना असलेल्या केबल साठी 1 प्रतिनिधी व 1 कॅमेरामन याप्रमाणे 2 प्रवेशिका मिळू शकतील.
वर नमूद व्यतिरिक्त (उदा. युट्यूब चॅनेल, ऑनलाईन वृत्तपत्र, संकेतस्थळ, सोशल मिडिया हॅन्डल) कुठल्याही प्रतिनिधीला किंवा कॅमेरामनला प्रवेशिका देण्यात येणार नाही.
प्रवेशिका संख्या कमी करण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकारी (प्राधिकारी) यांना असेल.

Previous Post

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

Next Post

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.