• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 17, 2025
in ताज्या बातम्या
0
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

बीड (महेश वाघमारे ) भाजपा, राष्ट्रवादी (श.प) आणि राष्ट्रवादी (अ. प) या पक्षात बीड नगराध्यक्षपदाची तिरंगी लढत होईल असे चित्र आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निर्माण झाले आहे.

सौ.स्मिता विष्णू भाऊ वाघमारे यांना राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) ने उमेदवारी दिली असून त्यांना बीड नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष आणि नगरसेवक असा एकूण तीन टर्मचा अनुभव आहे. उमेदवारी दाखल केलेल्या महिलेमध्ये राजकीयदृष्ट्या त्या एकमेव अनुभवी उमेदवार आहेत.तर भारतीय जनता पक्षाने डॉ सौ. ज्योती घुबंरे यांना उमेदवारी दिली असून त्या भूलतज्ञ आहेत , अजितद पवार यांच्या राष्ट्रवादी कडून उमेदवारी देण्यात आलेल्या सौ. प्रेमलता पारवे या निवृत्त नायब तहसीलदार असून त्यांना महसूल प्रशासनाचा अभ्यास आहे. याशिवाय अन्य मागास प्रवर्गातील महिलांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले असून यातील काहीना राजकीय पार्श्वभूमी असली तरी ती त्यांच्या पतीच्या,वडिलांच्या,भावाच्या माध्यमातून आहे.उमेदवारी देताना मागास प्रवर्गा अंतर्गत विविध जातींचाही विचार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. यातील सर्वात आश्चर्यकारक उमेदवारी म्हणजे भाजपच्या डॉ.ज्योती घुमरे यांची असून त्या नाक-कान-घसा विकारतज्ञ डॉ.रवी घुमरे यांच्या सुविद्य पत्नी आहेत.तर सौ.प्रेमलता पारवे यांची ओळख त्या येथील सायं दैनिक सिटीझनचे संपादक शेख मुजीब यांच्या सासूबाई अशी करून दिली जात आहे.

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारांची यादी कोणत्याच पक्षाने जाहीर केली नव्हती,ती पक्षाने ए.बी.फॉर्म दाखल केल्यावरच स्पष्ट झाली. अनुभवी नगरसेवकांना कोणत्या न कोणत्या पक्षाने उमेदवारी देतांना सामील करून घेतले आहे. काहीजण पुन्हा स्वगृही परतले असून काहींनी त्यांच्या पक्षाची वाट सोडून दुसऱ्या पक्षाची वाट धरली आहे.विविध राजकीय घराण्यातील पुढची पिढीही नशीब आजमावत असून तरुण उमेदवार देखील मोठ्या संख्येने निवडणूक लढवत आहेत.

Previous Post

वेळेवर निर्णय न घेतल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांची पांगापांग.

Next Post

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स'तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी 'प्रथा’ संग्रह सादर

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.