• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

वेळेवर निर्णय न घेतल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांची पांगापांग.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 17, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, राजकारण
0
वेळेवर निर्णय न घेतल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांची पांगापांग.

बीड (महेश वाघमारे )विधानसभा निवडणुकीतुन ( इलेव्हन्थ आवर ) ऐनवेळी माघार घेऊन नंतर प्रचार थंडावताच जवळपास राजकारणात सक्रिय नसणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांनी न प निवडणुकीतही उद्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या आदल्या दिवसापर्यंत कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय न घेतल्याने त्यांचे कट्टर समर्थक समर्थक भांबावले असून त्यातील काहींनी आज त्यांची साथ सोडत इतर पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.एकूणच जयदत्त क्षीरसागर यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची पांगापांग झाली आहे.

आज घडीला कोणत्याही पक्षात जयदत्त क्षीरसागर हे अधिकृतरित्या सक्रिय नाहीत मात्र गत विधानसभा निवडणुकीत त्यांनी त्यांचे पुतणे तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) कडून निवडणूक लढवलेल्या डॉ.योगेश क्षीरसागर यांचा जोमाने प्रचार केला होता याचमुळे आ.संदीप क्षीरसागर विरुद्ध डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यात तुल्यबळ लढत झाली होती. या निवडणुकीनंतर जयदत्त क्षीरसागर यांचे वास्तव्य हे बीडपेक्षा मुंबईत अधिक काळ असायचे.बीडला आल्यावर त्यांचे काही दौरे व भेटीगाठी सुरू असायच्या पण त्या अराजकीय.पण ते न प निवडणूक पार्श्वभूमीवर काही निर्णय घेतील या अपेक्षेने त्यांच्या समर्थकांनी पण प्रतिक्षेची भूमिका घेतली होती मात्र आज रविवारपर्यंत त्यांनी भूमिका घेतली नाही दरम्यान त्यांचे पुतणे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी आज राष्ट्रवादी सोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.तर जयदत्त क्षीरसागर यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या काळे घराण्यातील माजी नगरसेवक सविता राजेंद्र काळे,माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव यांनी शिवसेना (शिंदे) आणि माजी नगरसेवक प्रा.किशोर काळे यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) मध्ये प्रवेश केला आहे. विलास विधाते या हमखास निवडून येऊ शकणाऱ्या नगरसेवकाने देखील आता अण्णांची साथ सोडत राष्ट्रवादी (अ.प) मध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या अजून काही कार्यकर्त्यांनी आपापला मार्ग मोकळा करून घेतला आहे.या सर्वांनी न प निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी पण दाखल केली आहे.

अडचणीच्या काळात आणि घरातीलच मतभेद पुढे आल्यावर देखील आम्ही जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत ठाम राहिलो,विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील आम्हाला आणि एकूण कुणाशीही सल्लामसलत न करता आणि पुसटशीही कल्पना न देता त्यांनी उमेदवारी अर्ज परत घेत आम्हाला धक्का दिला, असे असतानाही आम्ही त्यांचा आदेश मानून डॉ.योगेश क्षीरसागर यांचा प्रचार केला.न प निवडणुकीत ते वेळेवर आणि ठाम निर्णय घेतील भला तो काही असो म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी अन सोबत राहणार होतो पण त्यांनी निराश केले,अडचणीच्या काळात आम्ही नेत्यासोबत उभे राहिलो पण नेत्याने आम्हाला राजकीयदृष्ट्या पोरके केले आणि यामुळे आम्ही आता आम्ही पर्याय शोधत आहोत अशी भावना एका सक्रिय अण्णा समर्थकाने (माजी) दिली.

Previous Post

आता भाजपातही क्षीरसागर:फडणवीसांनी केले स्वागत.

Next Post

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.