• Contact Us
  • Home
Saturday, February 7, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड! सर्व मंत्र्यांचे राजीनामे…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 16, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

गांधीनगर(वृत्तसेवा) दिवाळीच्या अगदी आधी गुजरात मंत्रिमंडळात मोठा फेरबदल झाला आहे. रिपोर्टनुसार, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुरुवारी रात्री ८ वाजता सर्व मंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी परत बोलावलं आहे.नवीन मंत्र्यांचा शपथविधी शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. गांधीनगर येथील महात्मा मंदिरात केंद्री गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

गुजरात सरकारमधील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ फेरबदल अखेर झाला आहे. वृत्तानुसार, मंत्रिमंडळात जुन्या चेहऱ्यांऐवजी तरुण आणि नवीन नेत्यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. राज्य सरकारला तीन वर्षं पूर्ण होत असतानाच हा बदल केला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या काही महिन्यांपूर्वीच मंत्रिमंडळात फेरबदल होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा किंवा शुक्रवारी सकाळी नवीन मंत्र्यांची नावे जाहीर केली जाऊ शकतात. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांची भेट घेतील आणि त्यांना पक्षाच्या राज्य संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. यामुळे पक्ष आणि सरकारमधील समन्वय मजबूत होईल. भाजपने अलीकडेच जगदीश विश्वकर्मा यांची गुजरातचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. “एक व्यक्ती, एक पद” या तत्त्वानुसार, विश्वकर्मा यांनी राज्य सहकार विभागाच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असावा.

Previous Post

इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री

Next Post

आज वसू बारस;दिवाळी सुरू..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

आज वसू बारस;दिवाळी सुरू..

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.