• Contact Us
  • Home
Monday, June 22, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 15, 2025
in ताज्या बातम्या
0

मुंबई (प्रतिनिधी) राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्री पद सोडलं आहे. आता इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री असणार आहेत. इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री असणार आहेत. वरळी येथे पार पडलेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली . काही दिवसांपूर्वी नागपूर येथील पक्षाच्या शिबिरात प्रफुल पटेल यांनी पालकमंत्री जिल्ह्यात येत नाही केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला येतात अशी टीका केली होती, त्यानंतर फेरबदलांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती.

तब्येतीचे कारण देत पालकमंत्री पद सोडलं

मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब पाटील यांनी काल (मंगळवारी) गोंदियाचा पालकमंत्री पद सोडलं आहे. तब्येतीचे कारण देत त्यांनी पालकमंत्री पद सोडलं आहे. त्यानंतर आता इंद्रनील नाईक हे गोंदियाचे पालकमंत्री असणार आहेत. पालकमंत्री पद मिळवण्यासाठी अनेक जण आग्रही असतात, मात्र बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री पद सोडलं आहे.

काही दिवसांपूर्वीच बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यांना सातत्याने पायाचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे लांबचा प्रवास होत नाही असं कारण त्यांनी दिलं आहे. तरी नुकताच नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक भव्य मेळावा पार पडला होता. त्या मेळाव्यामध्ये भाषण करताना खासदार प्रफुल पटेल यांनी विदर्भातील पालकमंत्री वेळ देत नाहीत, २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टसाठी फक्त येतात. इतर वेळी पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत असं म्हणत जोरदार टीका केली होती, त्याचबरोबर तेथील पदाधिकारी आणि नेते आहेत त्यांना सोबत घेत नाहीत अशी टीका केली होती. हीच किनार या पालकमंत्री पदाला आहे का अशी चर्चा सुरू आहे.

बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री पद सोडल्यानंतर आता राज्यमंत्री इंद्रनील नाईक आता गोंदियाचे नवीन पालकमंत्री असतील त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. इंद्रनील नाईक विदर्भातील मंत्री आहेत. त्यांना गोंदियाला जाणं सोयीस्कर राहू शकतं. त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे अशी माहिती स्वतः अजित पवारांच्या वतीने देण्यात आली आहे. बाबासाहेब पाटील यांनी जेव्हा पालकमंत्री पदाची चाचपणी सुरू होती तेव्हा त्यांच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मागितलं होतं. मात्र ती मागणी पूर्ण होऊ शकली नव्हती.

Previous Post

पडळकर बीडला येताच पेट्रस गायकवाडची गच्छंती..

Next Post

गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड! सर्व मंत्र्यांचे राजीनामे…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड! सर्व मंत्र्यांचे राजीनामे…

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी-देवेंद्र फडणवीस

June 2, 2026

विश्वकल्याणार्थ ९० दांपत्यांच्या ‘पंचकुंडीय भव्य विष्णूयाग’ संपन्न

June 2, 2026

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.