• Contact Us
  • Home
Friday, February 6, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

बीड जिल्ह्यातून दिवाळीसाठी विशेष बससेवा..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 11, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, विशेष वार्ता
0

बीड(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात दिवाळीसाठी विविध मार्गावर विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहेत, यात बीड- पुणे, जळगाव-मलकापूर, छत्रपती संभाजीनगर- अंबाजोगाई, लातूर, धुळे ,नांदेड या मार्गावर नवीन फेऱ्या सुरू होणार आहेत. तसेच बीड- परभणी, लातूर- कोल्हापूर, जालना- अंबाजोगाई ,पुणे-परळी ,माजलगाव- परभणी, लातूर -गेवराई या मार्गावरील बस फेऱ्याच्या संख्येत वाढ केली जाणार आहे .

असे असतील तिकिटाचे दर..

बीड ते पुणे प्रवासासाठी साध्या बसचे तिकीट ४४३ रुपये असणार असून ईबस अर्थात शिवाई बससाठी तिकिटाचा दर हा ६६७ रुपये असणार आहे, बीड ते मुंबई स्लीपर बस साठी तिकीट १०१९ इतके असेल तर बीड ते कोल्हापूर साधी बस चा तिकीट दर ६५४ तर स्लीपर बसचा तिकीट दर ८८८ रुपये असा असेल, अंबाजोगाई ते पुणे साध्या बसचे तिकीट ५७५ रुपये असे आहे .

बीड ते पुणे या मार्गावर तासाला १२ बस ,बीड सोलापूर मार्गावर दिवसाला आठ फेऱ्या, अंबाजोगाई संभाजीनगर मार्गावर दिवसाला पाच फेऱ्या ,बीड ते सिडको, बीड ते माजलगाव आणि परळी ते बीड दोन्ही बाजूने प्रत्येक तासाला बसची सोय करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध आगारांकडून नियोजन करण्यात आले आहे.

दिवाळीत फिरण्याची मेजवानी.

एसटी महामंडाळाकडून प्रवाशांसाठी खास ऑफर.
अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. सर्वत्र दिवाळीची लगबग सुरू आहे. दिवाळीच्या सुट्टीत सण साजरा केल्यानंतर काही जण फिरायला जातात. काही जण पर्यटनस्थळ गाठतात. पण प्रायव्हेट कंपनीच्या वाहनातून प्रवास करताना खर्च फार होतो. जर आपल्याला तीर्थस्थळे, पर्यटनस्थळे, आणि इतर प्रेक्षणीय स्थळे कमी पैशात पहायचे असतील तर, एसटीतूनही आपण प्रवास करू शकता.

दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांना मनसोक्त फिरण्यासाठी एसटी महामंडळाने पर्यटनासाठी मोठी संधी उपलब्ध केली आहे. एसटी महामंडळाने एसटीच्या भाडेदरात कपात केली आहे. किमान २२५ ते कमाल १ हजार २५४ रूपयांपर्यंत मोठी कपात केली आहे. एसटी महामंडळाला राज्य परिवहन प्राधिकरणाने ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याची मुभा दिली होती. जानेवारी महिन्यात १५ टक्के भाडेवाढ करण्यात आले होते.

सलमानला पोलिसांनी सिनेस्टाईल पकडलं; पनवेलमध्ये गुन्हा करून फरार, आरोपीचे कल्याणमध्ये मुसक्या आवळल्या
दरम्यान, दिवाळी सुट्ट्यांच्या कालावधीसाठी १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचाही निर्णय महामंडळातर्फे घेण्यात आला होता. मात्र, राज्यातील पुरस्थिती लक्षात घेता महामंडळाने हंगामी दरवाढ रद्द केलीय. आवडेल तेथे प्रवास या योजनेअंतर्गत प्रवाशांना कमी दरात फिरता येणार आहे.
प्रौढ तसेच लहान मुलांसाठी ४ आणि ७ दिवस अशा स्वरूपात पास मिळेल. महामंडळातील एसटी रातराणी, शिवशाही, ई- शिवाई, शिवनेरी अशा बसेसमध्ये या योजनेतून मिळणारे पास ग्राह्य धरले जाईल. या पासद्वारे प्रवाशांना अमर्यादित प्रवास करता येईल.

आवडेल तेथे प्रवास या योजनेअंतर्गत भाडेदर

साधी बस

४ दिवस (प्रौढ) – जुने दर (१,८१४), नवे दर (१,३६४).

४ दिवस (मुले) – जुने दर (९१०), नवे दर (६८५).

७ दिवस (प्रौढ) – जुने दर (३,१७१), नवे दर (२,३८२).

७ दिवस (मुले) – जुने दर (१,५८८), नवे दर (१,१९४).

शिवशाही

४ दिवस (प्रौढ) – जुने दर (२,५३३), नवे दर (१,८१८).

४ दिवस (मुले) – जुने दर (१,२६१), नवे दर (९११).

७ दिवस (प्रौढ) – जुने दर (४,४२९), नवे दर (३,१७५).

७ दिवस (मुले) – जुने दर (२,२१७), नवे दर (१,५९०).

ई- शिवाई

४ दिवस (प्रौढ) – जुने दर (२,८६१), नवे दर (२,०७२).

४ दिवस (मुले) – जुने दर (१,४३८), नवे दर (१,०३८).

७ दिवस (प्रौढ) – जुने दर (५,००३), नवे दर (३,६१९).

४ दिवस (मुले) – जुने दर (२,५०४), नवे दर (१,८१२).

Previous Post

दिवाळीच्या सुट्ट्या १६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत.

Next Post

प्रामाणिक आणि निष्ठावंतांनाच संधी देणार – आ.संदीप क्षीरसागर

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

प्रामाणिक आणि निष्ठावंतांनाच संधी देणार - आ.संदीप क्षीरसागर

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.