• Contact Us
  • Home
Tuesday, June 23, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

दिवाळीच्या सुट्ट्या १६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 11, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, शैक्षणिक
0

बीड(प्रतिनिधी ) शैक्षणिक वर्षात ५२ रविवारी शाळांना सुट्टी असते. याशिवाय शाळांना सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने अशा ७६ सार्वजनिक सुट्ट्यादेखील असतात. शैक्षणिक वर्षातील राहिलेल्या २३७ दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन होते. दरम्यान, यंदा जिल्हा परिषदेसह महापालिका, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना १२ दिवस दिवाळी सुट्टी असणार आहे. शैक्षणिक वर्षाच्या शेवटी २ मे ते १३ जूनपर्यंत शाळांना उन्हाळा सुट्ट्या असतील. तत्पूर्वी, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्वितीय सत्र परीक्षा सुरू होतील.

दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा उरकल्या जायच्या आणि विद्यार्थ्यांना एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच सुट्ट्या लागायच्या. म्हणजेच परीक्षा संपल्याने विद्यार्थी शाळेत येत नसत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने त्यात बदल करून सर्व शाळांची द्वितीय सत्र परीक्षा एकाचवेळी सुरू होईल, असे आदेश काढले. जेणेकरून शैक्षणिक वर्षातील किमान २२० दिवस तरी विद्यार्थ्यांचे अध्यापन व्हावे हा त्यामागील हेतू आहे.

२८ ऑक्टोबरपासून सुरू होतील शाळा

दिवाळीपूर्वीची प्रथम सत्र परीक्षा सुरू आहेत. १५ ऑक्टोबरपर्यंत परीक्षा संपतील. त्यानंतर १६ ऑक्टोबरपासून शाळांना तथा विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्ट्या लागतील. २८ ऑक्टोबरपासून पुन्हा शाळा सुरू होतील.

दिवाळीनंतर शिक्षकांना इलेक्शन ड्यूटी

दिवाळीनंतर नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यभरातील जिल्हा परिषदांसह पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. त्यासाठी मनुष्यबळ खूप लागणार आहे. त्यामुळे दोन्ही टप्प्यात शिक्षकांना निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत.

Previous Post

शिवाजीराव पंडितांनी विविध क्षेत्रात भरीव काम केले —- राज्यपाल बागडे

Next Post

बीड जिल्ह्यातून दिवाळीसाठी विशेष बससेवा..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

बीड जिल्ह्यातून दिवाळीसाठी विशेष बससेवा..

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी-देवेंद्र फडणवीस

June 2, 2026

विश्वकल्याणार्थ ९० दांपत्यांच्या ‘पंचकुंडीय भव्य विष्णूयाग’ संपन्न

June 2, 2026

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.