• Contact Us
  • Home
Saturday, February 7, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

जे सिद्ध करायचे ते केलेय,आता थांबू नका-जरांगे पाटील..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 2, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

बीड(प्रतिनिधी) “मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे,आपण हयात असेपर्यंत मराठा समाजाच्या लेकरांना आरक्षण मिळाल्याचे पाहायचे आहे” अशी काळजाला पीळ पाडणारी तीव्र इच्छा मराठा आरक्षण दृष्टीपथात आणणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवत आरक्षण दृष्टीक्षेपात आलेय,आता थांबू नका असा इशारा दिलाय.जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने ७५ वर्षांची लढाई जिंकून जीआर (शासकीय निर्णय) मिळवला आहे. त्यामुळे आता त्यांना कोणतीही चिंता वाटत नाही. “मी माझ्या जीवनात येऊन जे काही सिद्ध करायचे होते, ते सिद्ध केले आहे,” असे ते म्हणाले. गरीब मराठा समाज होरपळताना दिसत होता, म्हणूनच आपण हे काम हाती घेतले. आपल्या या लढ्यात कधीतरी मागे सरकलो असेल किंवा एखादी चूक झाली असेल, पण आपण कधीही नाटक केले नाही किंवा खोटे बोललो नाही. समाजाचा हट्ट आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण रात्रंदिवस झटत राहिलो. त्यांनी ६ कोटी मराठा लेकरांना सुखी आणि समाधानी राहण्याचे आवाहन केले.

प्रकृती खालावली असतानाही जरांगे पाटील रुग्णवाहिकेतून नारायणगड येथील दाखल झाले पण त्यांनी समाजबांधवात चैतन्य निर्माण करणारे भाषण केले.त्यांनी आरक्षणाच्या लढ्यात गद्दारी करणाऱ्या आणि फितुरी करणाऱ्यांवर कठोर टीका केली. सातारा (पश्चिम महाराष्ट्र) आणि हैदराबाद गॅझेट (मराठवाडा) मधील काही लोकांनी केलेल्या फितुरीबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “जर मी विकून गद्दारी करून मोठा झालो असतो, तर तुम्ही फितुरी करायला हवी होती,” असे ते म्हणाले. जे लोक ४५ वर्षांच्या लढाईत समाजाला काही देऊ शकले नाहीत, केवळ टीव्हीवर बोलले आणि पुस्तके वाचली, त्यांनी केलेली टीका निरर्थक आहे. आपण केवळ दोन वर्षांत ३ कोटी गरीब मराठ्यांना आरक्षणात आणले असून, गावंच्या गावं कुणबी निघाली आहेत. म्हणून, समाजाने हुशारीने वागून मिळालेल्या आरक्षणात समाधानी राहावे आणि समाजाला अडचणीत आणणारे वर्तन टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.मराठा समाजाला केवळ आरक्षणावर अवलंबून न राहता सत्ता (शासक) आणि प्रशासनात आपले स्थान निर्माण करण्याचे तीव्र आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले आहे. ते म्हणाले की, “जर शासक बनलात, तर कोणाकडेही काही मागायची गरज लागणार नाही.” घरात शेतीचे काम करत असतानाही, शासक बनण्याचे ध्येय प्रत्येकाच्या डोक्यात असले पाहिजे. आपल्या जातीवर आलेला दारिद्राचा डाग पुसण्यासाठी आणि जातीला सन्मानाने सांभाळण्यासाठी, समाजातील तरुणांनी केवळ शासकच नव्हे, तर प्रशासकही बनणे आवश्यक आहे.

प्रशासनाची ताकद स्पष्ट करताना जरांगे-पाटील म्हणाले की, “प्रशासनात एवढी ताकद आहे की, कोणताही दादा असला तरी, राजकीय व्यक्ती असला तरी, त्याला प्रशासनासमोर हात जोडून उभे राहावे लागते.” केवळ कष्ट करा आणि हात जोडून पळा, असे नको. समाजाची मुले अधिकारी झाली आणि प्रत्येक क्षेत्रात पोहोचली, तर समाजाला खरा आधार मिळेल. त्यांनी खेद व्यक्त केला की, अनेक बोगस लोक (गैर-पात्र) आरक्षणाचा गैरफायदा घेऊन प्रशासनात उच्च पदांवर बसले आहेत आणि “सगळे त्यांचे बसलेत” (सर्वत्र त्यांच्याच लोकांचे वर्चस्व आहे). सत्ता असो वा नसो, प्रशासनात आपले अधिकारी असतील, तर ते सगळी व्यवस्था सरळ करतील.समाजातील लोकांना भावनात्मकता सोडून कडवट होण्याचा आणि स्वाभिमानाने जगण्याचा सल्ला दिला. “तुमच्या डोक्यातील दया, माया जाईना,” असे बोलत त्यांनी समाजाला अधिक कणखर होण्याची गरज बोलून दाखवली. जर एखाद्याने तुमच्या जातीचा अपमान केला, तर त्याला कडवा झटका द्या. “आता आपल्याला प्रशासनात लोकं घालायची आहेत, खूप मुलं अधिकारी करायची आहेत,” हाच आपला अंतिम उद्देश असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. समाजाला सन्मानाने जगायचे असेल, तर अधिकाधिक तरुणांनी प्रशासनात उच्च पदे मिळवावीत, हेच त्यांचे महत्त्वाचे आवाहन आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी भाषण करताना हैदराबाद निजामाचं गॅझेट असं म्हणून समाजाला डिवचलं त्यांच्यावरही तोंडसूख घेतलं. त्यांनी गुलामीचं गॅझेट म्हणणारी माकडं आहेत. असं म्हणत बोचरी टीका केली.ते म्हणाले, गुलामीचं गॅझेट म्हणायचं अन् तीन चार महिने गप बासायचं. आमचं गुलामीचं गॅझेट तर इंग्रज का तुमच्या घरात राहात होता का… त्या नाक तोडीला म्हटलो का असं म्हणत त्यांनी नाव न घेता गुलामीचं गॅझेट म्हणून टीका करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं. तुम्ही आमच्या मुलांना गुलाम म्हणता का असा सवाल देखील त्यांनी केला.तुमच्यासारखं आडनाव असलेल्या अन् कुणबी प्रमाणपत्र असलेला तुमची भावकी आहे. त्याला फोन करा अन् प्रमाणपत्र घ्या. सगळी प्रमाणपत्र दिवाळीपूर्वी आली पाहिजेत. कोण नाही म्हणाला तर मला सांगा असं ते म्हणाले.

शेतकऱ्यांचीही काळजी..

सरकारनं दिवाळीपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करायचा. शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ७० हजार रूपये मदत कारायची. ज्यातं शेत वाहून गेलं, पीक वाहून गेलं. त्यांना हेक्टरी १ लाख ३० हजार रूपये मदत करायची. तसचं ज्यांच्या पीकांचं नुकसान झालं आहे त्यांना १०० टक्के नुकसान भरपाई द्यायची. त्यांनी म्हणल तसं पंचनामा करायचा. शेतकऱ्यांचा एक रूपयाही कापायचा नाही.सरकारी अधिकाऱ्यांच्या परागारातील चौथा हिस्सा कापून शेतकऱ्यांना द्या. एका पक्षाकडं १००० आमदार आहेत. राजकारण्यांची प्रॉपर्टी देखील कापा. अंबानीचं तेल मीठ बंद करा खरं शेतकऱ्यांना पैसे द्या.

Previous Post

॥  विजयादशमी  ॥

Next Post

आमच्या ताटातलं हिरावून घेऊ नका-पंकजाताईचा इशारा…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

आमच्या ताटातलं हिरावून घेऊ नका-पंकजाताईचा इशारा…

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.