• Contact Us
  • Home
Friday, February 6, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

॥  विजयादशमी  ॥

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 2, 2025
in ताज्या बातम्या
0

*॥  विजयादशमी  ॥*

दि.०२।१०।२०२५

🟣 या दिवशी- विजय, कीर्ती, आयुष्य, आरोग्य, यश, इत्यादी प्राप्ती करिता; प्रातःकाळी सिंहासनाची ( व्यापारी-उद्योजक इत्यादींची बसण्याची खुर्ची आसन वगैरेची) पूजा करावी.
तसेच शस्त्रपूजा – अवजारे इत्यादींची देखील पूजा  करावी.
(छत्र- शस्त्रादी समंत्रक  पूजा पद्धती विस्तृत असलेने सर्व पूजा टाईप करून पाठविणे समयाऽभावी शक्य होत नाही.)

🟣 अपराण्ह काळी- विजय मुहूर्तावर ( आजचा विजय मुहूर्त- १४.२१ ते १५.०८ पर्यंत आहे.) गावाबाहेरील ईशान्येला *अपराजिता* आणि *शमीचे पूजन करावे. शमीचा वृक्ष अप्राप्य असल्यास; “शम्याभावे” ; अश्मंतक* (आपटा) *यांचे पूजन करावे.*

🟣 याचा संकल्प :-
*मम सपरिवारस्य क्षेमायुः पुष्टि महैश्वर्य विजय संपदादि अभीष्ट सिद्ध्यर्थं श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं अपराजिता पूजनं तथाच मम सपरिवारस्य निखिल दुरित अमंगल आधि व्याधि दुःख निरास पूर्वकं यात्रायां विजय क्षेम ऐश्वर्य आयुः आरोग्य सौमंगल्यादि अभीष्ट सिद्धिद्वारा श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं शमीपूजनं ( शम्याऽभावे अश्मंतक पूजनं) सहतंत्रेण करिष्ये।*

🟣 असा संकल्प करून; गणेशपूजा करावी. वरती
सांगितल्याप्रमाणे;शमीच्या वृक्षाखाली चंदनाने अष्टदल पद्म काढून ; मध्ये (मातीची अथवा लता (वेली रूप) *”अपराजिता”* ( गोकर्ण वेली) ठेवावी. तिच्या  दक्षिणेला “क्रियाशक्ति” (जया) आणि उत्तरेला “उमा” (विजया) यांची नाममंत्राने आवाहनादी षोळशोपचार पूजा करावी. पुढील मंत्रांनी  अपराजिता सहित दोन देवतांची प्रार्थना करावी. 

🟣 प्रार्थना मंत्र:-
*चारुणा मुख पद्मेन विचित्र कनकोज्वला । जयादेवी शिवे भक्ता सर्वकामान् ददातु मे ॥*

*कांचनेन विचित्रेण केयूरेण विराजिता ।  विजया तु महिभागा करोतु विजयं मम ॥*

*हारेणसु विचित्रेण भास्वत् कनमेखला । अपराजिता रुद्रभक्ता करोतु विजयं मम ॥*

या मंत्रांनी प्रार्थना करून ;

पुढील मंत्राने (अपराजिता) देवीचे विसर्जन करावे.

🟣 विसर्जन मंत्र:-
*इमांपूजां मया देवि  यथाशक्ति निवेदितां रक्षणार्थं समादाय व्रज स्वस्थानं उत्तमम् ॥*

या मंत्राने विसर्जन झाल्यावर; “हरिद्रारंजित” सूत्राने अथवा वस्त्राने  ( हळद लावलेल्या दो-याने ) दूर्वेसहित ती अपराजिता (वेली) वलयाकार तयार करून; पुढील मंत्राने अभिमंत्रित करावी.

🟣 मंत्र:-
*सदापराजिते यस्मात् त्वं लता सूत्त मामता । सर्व कामार्थ सिद्ध्यै त्वां तस्मात् पूजित वा नहं ॥*

*भवा पराजिते देवि मम सर्व समृद्धये । पूजितायां त्वयि श्रेयो ममाऽस्तु दुरितं हतं ॥*

इति तद् वलयं अभिमंत्र्य !

🟣 *जयदे वरदे देवि दशम्यां अपराजिते । धारयामि भुजे दक्षे जय लाभ अभिवृद्धये ॥*

*बलं आधेहि वलयं मयि शत्रौ पराभवं । त्वत् धारणात् भवेयुर्मे धनधान्य समृद्धयः ॥*

या दोन मंत्रांनी ते अभिमंत्रित केलेले अपराजिताचे वलय आपल्या उजव्या बाहूला बांधावे.

🟣 या नंतर शमीवृक्षाच्या मुळाशी; अष्टदिक्पाल, वास्तुदेवतांची यथाशक्ती पूजा करावी.

🟣 या नंतर; पुढील मंत्रांनी ध्यानासह *”शमीपूजन”* करावे. 

शमी ध्यान मंत्र:-
*अमड़्ला नाशमनीं शमनीं दुष्कृतस्य च । दुःख प्रणाशिनीं धन्यां प्रपद्येहं शमीं शुभां ॥*

या मंत्राने शमीचे ध्यान करून; यथाशक्ती पूजा करावी.
पुढील मंत्रांनी शमीची प्रार्थना करावी..

🟣 *शमी शमयते पापं शमी लोहित कंटका । धारिणि अर्जुन बाणानां रामस्य प्रियवादिनी ॥*

*करिष्यमाण यात्रायां यथाकालं सुखं मया । तत्र निर्विघ्न कर्त्रीत्वं भव श्रीराम पूजिते ॥*

तसेच; *शमीवृक्ष संन्निध (जवळ) नसल्यास ; अश्मंतकाचे  ( आपट्याचे) पूजन करावे.*

🟣 अश्मंतक पूजन मंत्र:-

*अश्मंतक महावृक्ष महादोष निवारण । इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रु विनाशनम् ॥*

या मंत्राने अश्मंतकाचे पूजन आणि प्रार्थना करावी.

🟣 या नंतर; शमीवृक्षाच्या (अथवा अश्मंतकाच्या) मुळाशी ओल्या केलेल्या अक्षदा वहाव्यात.
त्या वाहिलेल्या ओल्या अक्षदा, शमीच्या मुळाची माती, शमीची पानं, अश्मंतकाची पानं इत्यादी घेऊन; मंगल वाद्यघोष करित होत्साता अलंकारादी धारण करत गृहप्रवेश करावा.

🟣 स्वजनांसह स्त्रियेकडून  “औक्षण” करून घ्यावे.
विप्रवर्यांना दक्षिणा तांबूल आदी देऊन;त्यांना आणि घरातील ज्येष्ठ मंडळींना अभिवादन करून; आशीर्वाद घ्यावेत.

🟣 या दिवशी “सरस्वती उत्सवाची” सांगता करावी.
*नवनवीन विद्या शिकण्याचा आरंभ करावा.*

वे.शा.सं.श्री.अमोलशास्त्री जोशी,

श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.

९५११८६९१५५

श्रीगुरुदेव दत्त..!

Previous Post

आ.संदीप क्षीरसागर नागरिकांच्या मदतीसाठी सरसावले

Next Post

जे सिद्ध करायचे ते केलेय,आता थांबू नका-जरांगे पाटील..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

जे सिद्ध करायचे ते केलेय,आता थांबू नका-जरांगे पाटील..

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.