• Contact Us
  • Home
Wednesday, June 24, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

राज्यात आठ नवी वैद्यकीय महाविद्यालये

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 2, 2024
in ताज्या बातम्या
0

केंद्र सरकारच्या १०० दिवसांत केंद्रित मंत्री या नात्याने केलेल्या कामांची माहिती आज ना. प्रतापराव जाधव यांनी दिली. त्यासाठी बुलडाणा येथील बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी मध्ये एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

“मागच्या १०० दिवसांत आयुष मंत्रालयाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. नव्या मेडिकल कॉलेजला मान्यता दिल्या. देशात १० ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा सुरू होत आहे अशी माहिती यावेळी ना जाधव यांनी दिली.

पुढे बोलतांना ना.जाधव म्हणाले की, आधी आयुर्वेदिक औषधी सहज उपलब्ध होत नव्हती मात्र आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आयुष औषधी केंद्र आम्ही सुरू करत आहोत.इथे विविध उपचार पद्धतींची औषधे मिळतील. जिल्हा रुग्णालयात आता अमृत स्टोअर सुरू करून तिथे उच्च दर्जाची औषधे सवलतीच्या दलात मिळणार असल्याचेही ना. जाधव म्हणाले. धनत्रयोदशी चे महत्व अनेकांना माहीत नाही. धनत्रयोदशीला प्रत्येक घरी धन्वंतरीची पूजा करून आरोग्यदायी जीवनाची प्रार्थना करावी अशी अपेक्षा देखील ना जाधव यांनी व्यक्त केली. गेल्या १० वर्षात २२ एम्स रुग्णालये देशात उभे राहिलेत. २०१४ पूर्वी देशात ३८७ मेडिकल कॉलेज होते आता ती संख्या ७७४ झाली. आधी देशभरात मेडिकलच्या जागा ५१ हजार होत्या, आता त्यात वाढ होऊन ११५८१२ अधिक ८०० एवढ्या मेडिकल जागा आता निर्माण झाल्या आहेत असेही ना.जाधव म्हणाले. प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण आरोग्य केंद्र इथेही आता अनेक सुविधा निर्माण होत आहेत असेही ना.जाधव म्हणाले.

मेडिकल कॉलेजचे श्रेय कुणाचे?

दरम्यान यावेळी बुलडाणा येथे नव्याने सुरू होत असलेल्या मेडिकल कॉलेजचे श्रेय कुणाचे असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता ना.जाधव म्हणाले की, सगळ्यांनी प्रयत्न केले. आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले, कुणी विरोध केला नाही त्यामुळे ही काही श्रेयवादाची लढाई नाही असे ना.जाधव म्हणाले. खामगाव जालना मार्गाचा विषय सुद्धा पुढे गेला आहे. रेल्वे बोर्डाकडून हा विषय आता नीती आयोगाकडे जाईल आणि त्यानंतर हा विषय केंद्रिय कॅबिनेट पुढे जाईल असे ना.जाधव म्हणाले.

Previous Post

जयदत्त अण्णांच्या होम मिनिस्टरमुळे शहरातील महिलांनी घेतला मोकळा श्वास

Next Post

घटस्थापनेला युतीचे शंभर उमेदवार जाहीर होणार!

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
घटस्थापनेला युतीचे शंभर उमेदवार जाहीर होणार!

घटस्थापनेला युतीचे शंभर उमेदवार जाहीर होणार!

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी-देवेंद्र फडणवीस

June 2, 2026

विश्वकल्याणार्थ ९० दांपत्यांच्या ‘पंचकुंडीय भव्य विष्णूयाग’ संपन्न

June 2, 2026

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.