
नमस्कार..!
दिनाङ्क ११|०५|२०२५
*॥ श्रीनृसिंह जयंती ॥*
🟣 वैशाख शुद्ध चतुर्दशी ही श्रीनृसिंह जयंती होय.
🟣 या दिवशी प्रदोषकाळी नृसिंहाचा जन्म (प्रकटन) झाला.
करिता; पापनाशक आणि पुण्यकारक असे हे जन्मकालाचे व्रत प्रतिवर्षी करावे.
न केल्यास मोठा दोष आहे.
(नृसिंहपुराण- हेमाद्री)

🟣 त्रयोदशीला एकभुक्त रहावे.
(एकवेळा आहार करणें याला एकभुक्त म्हणतात.)
चतुर्दशीचे दिवशी माध्यान्ही मृत्तिका (माती) गोमय, तीळ आणि आवळ्याचा वाटून कल्क करावा किंवा आवळ्याची पावडर वापरून त्याचे उटणे ( करून) अंगाला लावून स्नान करावे.
🟣 पुढील मंत्राने व्रताचा संकल्प करावा..
*उपोष्येऽहं नारसिंह भुक्तिमुक्ति फलप्रद । शरणं त्वां प्रपन्नोऽस्मि भक्तिं मे नृहरे दिश ॥*
(पूजासमुच्चय)
अथवा
*नृसिंह देवदेवेश तव जन्मदिने शुभे । उपवासं करिष्यामि सर्वभोग विवर्जितः॥*
(निर्णयसिंधू)
या प्रमाणे व्रताचा संकल्प करून; पूजन इ. करण्याकरितां आचार्यांचे “वरण” (नियुक्ती) करावे.
🟣 सायंकाळी धान्यराशीवर उदकयुक्त कलश ठेऊन त्या वर पूर्णपात्र ठेवावे.
त्या पात्रात सुवर्णाची अथवा देवघरातील श्रीनृसिंहाची मूर्ती ( प्रतिमा ) ठेऊन; ध्यानासहित आवाहनादी षोळशोपचार पूजा करावी.
🟣 पुढील मंत्राने देवाला अर्घ्यदान करावे .
अर्घ्यमंत्र :- *परित्राणाय साधूनां जातो विष्णो नृकेसरी । गृहाणार्घ्यं मया दत्तं सलक्ष्मीर्नृहरिः स्वयम् ॥*
श्रीलक्ष्मीनृसिंहाभ्यां नमः इदमर्घ्यं समर्पयामि..!
🟣 रात्री जागरण करुन; प्रातःकाळी देवाची पूजा करावी.
( सुवर्ण) प्रतिमा पूजन केलेले असल्यास ;त्या प्रतिमेचे विसर्जन करून; गोप्रदान पूर्वक ती प्रतिमा पुढील मंत्राने उपाध्याला ; मंत्र पूर्वक दान करावी.
दानमंत्र:-
*नृसिंहाच्युत गोविंद लक्ष्मीकांत जगत्पते । अनेन अर्चा प्रदानेन सफलास्यु: मनोरथाः ॥*
येणेप्रमाणे संकल्प पूर्वक दान केल्यावर; पुढील मंत्राने देवाची प्रार्थना करावी..
🟣 प्रार्थना मंत्र :-
*मद्वंशे ये नरा जाता ये जनिष्यंति चापरे । तां स्त्वमुद्धर देवेश दुःसहाद्भव सागरात् ॥ पातकार्णव मग्नस्य व्याधि दुःखांबु वारिधेः। नीचैश्च परिभूतस्य महादुखा गतस्य मे ॥करावलंबनं देहि शेषशायिन् जगत्पते। श्रीनृसिंह रमाकांत भक्तानां भयनाशन ॥ क्षीरांबुधिनिवास त्वं चक्रपाणे जनार्दन । व्रतेनानेन देवेश भुक्तिमुक्ति प्रदोभव ॥*
(पूजासमुच्चय)
🟣 या नंतर आपापल्या कुलाचाराप्रमाणे सुवासिन्याऽदी भोजन करून; व्रत सांगता (पारणा) करावी.
____________________
🟣 या वैशाख पौर्णिमेला कांही विशिष्ट प्रकारची दाने केल्यास; त्याची काही विशेष फलं पुढील प्रमाणे जाणावी..
१} शिजविलेल्या अन्नांसह उदकुंभ दान केल्यास- गोदानाचे फळ.
(जाबाली-अपरार्क)
२} सुवर्ण आणि तिलयुक्त १२ उदकुंभ – ब्रह्महत्या पातकांपासून मुक्ती.
(जाबाली-अपरार्क)
३} विधियुक्त कृष्णाजिन दान- पृथ्वी दानाचे फळ
(विष्णु)
४} सुवर्ण, मध, तिळ, तूप , यांनी युक्त कृष्णाजिन दान :- सर्व पापनाश
(विष्णु)
५} तिलस्नान, तिलहोम, तिलपात्र , तिळाच्या तेलाचा दीप,तिलोदकाने पितृतर्पण, मधुयुक्त तिलदान. – ही केली असता महाफल सांगितले आहे.
(ज्योतिषग्रंथ)
🟣 या तिथीस (पौर्णिमेला)स्नान – दान केल्यावाचून राहूं नये.
(भविष्यपुराण)
_____________________
🟣 या दिवशी (पौर्णिमेला) वैशाखस्नानाचे उद्यापन करावे .
__________________
🟣 या पौर्णिमेपासून ज्येष्ठ शु. एकादशी पर्यंत श्रीविष्णुंची मूर्ती उदकांत ठेऊन तिची रोज पूजा – उत्सव इत्यादी करावे .
श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
९५११८६९१५५
श्रीगुरुदेव दत्त…!