• Contact Us
  • Home
Thursday, February 5, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाही-भेंडवळची भविष्यवाणी.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
May 1, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, विशेष वार्ता
0

बुलडाणा (प्रतिनिधी) शत्रू भारताचे काहीही वाकडे करू शकणार नाही अशी भविष्यवाणी भेंडवळ येथील घट मांडणी नंतर करण्यात आली आहे. घटातील शत्रूचे प्रतीक असलेला मसूर हे धान्य थोड्या प्रमाणात दबलेले आढळले त्यामुळे शत्रूंच्या कारवाया सुरूच राहतील. परंतु करडी धान्य म्हणजे देशाची संरक्षण व्यवस्था..करडी हे धान्य साबूत असल्यामुळे संरक्षण व्यवस्था मजबूत राहील. त्यामुळे शत्रू आपल्या देशाचे काही वाकडे करू शकणार नाही. परंतु देशावर संकट असल्याने राजाला प्रचंड ताण राहील देशाच्या तिजोरीत खळखळाट असेल अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे.

त्याशिवाय यावर्षी भरपूर पावसाळा असून जून सर्वसाधारण, जुलैमध्ये भरपूर पाऊस, ऑगस्टमध्ये साधारण पाऊस तर सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस बरसणार आहे. अवकाळी पावसाचे सुद्धा थैमान राहील त्याचबरोबर पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारण राहील. आणि करव्या वरील पुरी गायब असल्याने पृथ्वीवर प्रचंड संकट येतील त्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्तींचा सहभाग असू शकतो. पिकांच्या उत्पन्नाची अनिश्चितता असून भावातही तेजी मंदिर राहील कुठे कमी तर कुठे जास्त पीक येईल. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी सुद्धा होईल आणि पिकांवर रोगराई पसरेल असाही अंदाज भेंडवळच्या घटमांडणीत वर्तवला आहे.

दरम्यान, घटामध्ये मांडलेल्या १८ धान्यामध्ये अनेक ठिकाणी फेरबदल झालेले आढळून आले त्यावरून भविष्यवाणी जाहीर करण्यात आली. भेंडवळची भविष्यवाणी ऐकण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर विदर्भातील अनेक शेतकरी रात्रीपासूनच मुक्कामी होते.

भेंडवडची मांडणी

कापूस पिक -सर्व साधारण
ज्वारी पिक:- साधारण भावात चांगले
सोयाबीन :- चांगले
तूर पिक: – साधारण
मुंग पिक: – साधारण
उडीद पिक :- सर्वसाधारण
तील पिक :-चागले
भादली :- रोगराई जास्त
बाजरी पिक :- उत्तम
तांदूळ पिक:- साधारण/ भावात तेजी
मठ पिक सर्व- साधारण
जवस् पिक:- साधारण /नासाडी
लाख पिक:- साधारण भावत तेजी
वाटाणा पिक:- साधारण
गहू पिक: – साधारण
हरबरा:- साधारण/भाव कमी

देश
नैसर्गिक आपत्ती संरक्षण खाते मजबूत राहील
परकीय देशाचा त्रास राहील
आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट राहील

पाऊस
जुन कमी व साधारण
जुलै साधारण जून पेक्षा जास्त
ऑगस्ट सर्व साधारण
सप्टेंबर जास्त व् अवकाळी पाऊस

Previous Post

जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लवकरच निवडणूका;सुप्रीम कोर्टाचा आदेश.

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लवकरच निवडणूका;सुप्रीम कोर्टाचा आदेश.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.