• Contact Us
  • Home
Thursday, July 31, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

कर्तुत्ववान माऊलीचा,भाग्यवान “शिवसंग्राम”

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
April 15, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, व्यक्ती विशेष
0

बीड (प्रमोद कुलकर्णी)-
“माऊली” या शब्दाचा मोठा अर्थ आहे. विटेवर उभे असलेली विठू माऊली, ज्ञानियाचा राजा ज्ञानोबा माऊली, माता माऊली या शब्दातून जो अर्थ समजून येतो म्हणजे आई सारखेच आपल्या पोटच्या लेकराप्रमाणेच इतर सर्वांची काळजी घेणारी ,वेदना आणि इतरांच्या चुका पोटात घालून केवळ सर्वांच्या आनंदासाठी आणि प्रगती सौख्यासाठी मायेचा सतत वर्षाव आणि ध्यास घेणारी ती म्हणजे “माऊली” असते. “भाग्यवान” असतात ते, ज्यांना अशा माऊलीचं सहवासप्रेम, आशीर्वाद ,जवळीक ,मायेचा स्पर्श लाभलेला असतो, तसे भाग्यवान हा शिवसंग्राम परिवार आहे असे मला वाटते.


‘ मित्र कमी असले तरी हरकत नाही पण शत्रू एकही नसावा’ ‘मोठे नाव झाले नाही तरी हरकत नाही पण बदनामी एकही नको’, सज्जनशक्ती जमा करणे जपणं आणि आपल्या संस्काराने वाढवणे ही असती माऊलीची शिकवण .
आभाळ कोसळून सारं कसं अस्ताव्यस्त व्हावं आणि एका मोठ्या संकटानंतर सावरण्यासाठी फार मोठ धैर्य, कष्ट आणि जिद्द ठेवावी लागते , असं सगळं ज्यांच्या वाट्याला आलं त्या ज्योतीताईचं धैर्य, कष्ट, जिद्द आणि प्रेमभाव शिवसंग्राम परिवारातील प्रत्येक सदस्य पाहतो, अनुभवतो, प्रेरणा घेत सावरतो आहे .
लोकनेते स्व. विनायकराव मेटे यांनी आपल्या प्रचंड संघर्ष शक्तीने निर्माण केलेला हा समाजाचा मोठा प्रपंच त्याच गुणसंपदेने एक- एक पाऊल पुढे जात आहे.
साहेब नसताना हा ताईसाहेबांचा वाढदिवस शिवसंग्राम कुटुंबाने वेदना आणि संवेदना जागृत ठेवून साजरा केला आहे. खरोखर या प्रत्येक कार्यकर्त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.आज बीडचे दैवत शिवपार्वती संस्थान महादेव “कंकालेश्वराला” अभिषेक करत ताईसाहेब आणि शिवसंग्राम परिवारासाठी घातलेले साकडं. शहशांवली दर्गा येथे चादर चढवून दुवा पठण. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने अभिवादन, यासारख्या सातत्याने समाजसलोखा अबाधित रहावा यासाठी शिवसंग्रामच्या प्रत्येक सदस्याकडून होत असलेले कार्य अनमोल आहे.
प्रदेश नेतृत्व प्रभाकर आप्पा कोलंगडे,नारायणराव काशीद, जिल्हा अध्यक्ष प्रा सुभाष जाधव सर,अनिल भाऊ घुमरे, सुहासराव पाटील ,मनोजजी जाधव , हरिश्चंद्र ठोसर, सौ संगीताताई,प्रा. पंडित शेंडगे, शेषराव तांबे, ज्ञानेश्वर कोकाटे, प्रशांत डोरले,अनिकेत व गोपीनाथ भय्या देशपांडे,अमजद पठाण शेख अजहर भाई ,कुपकर, मस्केजी अशी अनेक नावे सर्वांची मला ओळख नावातून नसली तरी कार्यातून दिसते आशा सर्व शिवसंग्राम परिवारातील सदस्यांनी ताईच्या वाढदिवसानिमित्ताने आपल्या भावना , आदरभाव आणि सक्रिय राहत शिवसंग्रामच्या वाढीसाठी सातत्याने सुरू असलेले उपक्रम यातून या मोठ्या परिवारातील सलोखा, समाज, भाग -परिसर- मतदारसंघ जिल्हा आणि राज्यभर शिवसंग्रामच्या कार्याची दखल घेतली जात आहे. या परिवाराच्या आणि सर्वांच्या भाग्याचे आणि गौरवाचे म्हणजे ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या एवढे उच्च विद्या विभूषित, संयमी, अभ्यासू ,निर्भही ,कणखरपणा, चारित्र्यसंपन्नता साहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी कृतीशील आणि गतिशील असलेले नेतृत्व या परिवाराला लाभले आहे, त्यांना यश, कीर्ती ,दीर्घायुष्य लाभावे ही तुळजाभवानी चरणी प्रार्थना या माऊलीसाठी अनेक मावळ्यांनी केलेली आहेच, ही परिवार शक्ती ,संघटन आणि सामाजिक सलोख्यासाठी, समाज प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एक “सक्षम नेतृत्व” म्हणून आगामी काळात डॉ .ज्योतीताईंना ईश्वरी आणि सामाजिक पाठबळ, आशीर्वाद मिळत राहो असंच वाढदिवसाच्या निमित्ताने शुभचिंतन करतो आहे…
प्रमोद कुलकर्णी, पत्रकार बीड.
(९४०३९०४६५१) दि.१४ एप्रिल २०२५.

Previous Post

NO FILE ONLY LIFEओमप्रकाश शेटे यांनी आयुष्यमान भारत मिशनचा पदभार स्वीकारला.

Next Post

पहलगाम हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना 50 लाखाचे अर्थसहाय्य

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post

पहलगाम हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना 50 लाखाचे अर्थसहाय्य

ताज्या बातम्या

कामधेनू केअर सेंटर ही काळाची गरज-पाचपोर महाराज.

July 31, 2025

उद्योजक प्रकाश सुलाखे डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी स्मृती पुरस्काराने सन्मानित

July 28, 2025

पुन्हा भेटताही येत नाही…! विसरता ही येत नाही…!

July 12, 2025

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.